…..तरच लोकांना एकत्र जमता येईल; सणासुदीच्या कालावधीत मोदी सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली,

सणवार सुरू झाले आहेत. लोक सण, उत्सव साजरे करण्याच्या तयारीत आहे. खरेदीसाठी घराबाहेर पडत आहे, बाजारात जात आहे. पण कोरोनाच्या दुसरी लाटेशी लढा, तिसर्‍या लाटेचं संकट, त्यात कोरोनाचे विविध भयंकर आणि अधिक संसर्गजन्य व्हेरिएंट यामुळे या कालावधीत आणि त्यानंतर परिस्थिती भीषण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सावध केलं आहे. केंद्र सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन केलं आहे.

अद्याप कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. 42 जिल्ह्यांमध्ये दररोज 100 पेक्षा जास्त प्रकरणं समोर येत आहे. 38 जिल्ह्यांचा वीकली पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्क्यांच्या मध्ये आहे. अशात जर एकत्र जमणं गरजेचंच असेल तर पूर्ण लसीकरण आवश्यक आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोना परिस्थितीबाबत पत्रकार परिषद घेतली. इंडियन काउन्सिल ऑॅफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक डॉ. बलराम भार्गवा यांनी सांगितलं, जर एकत्र जमणं गरजेचंच असेल तर पूर्ण लसीकरण आवश्यक आहे. म्हणजे लोकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले असायला हवेत. लसीकरणानंतरही मास्क घालणं बंधनकारक आहे.

देशात फक्त 16म पूर्ण लसीकरण झालं आहे. तर 54म टक्के नागरिकांचं अंशत: लसीकरण झालं आहे. 3 राज्यांमध्ये 100 टक्के लोकांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. यामध्ये सिक्की, दादरा आणि नगर हवेली, हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. इथं 100 टक्के 18 नागरिकांना कोरेना लशीचा पहिला डोस मिळाला आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही सण, उत्सव साजरे करण्याची गरज आहे, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना लशीचा दुसरा डोस घ्यायलाच हवा कारण यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अनेक प्रेग्नंट महिलांनी कोरोना लस घेतलेली नाही. त्यांनी पुढे घेऊन लस घ्यावी. कोरोना लस त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बाळासाठी खूप महत्त्वाची आहे, असंही डॉ. पॉल यांनी सांगितलं.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!