मेस्सीची बार्सिलोना 10 नंबर जर्सी या खेळाडूला मिळाली
नवी दिल्ली,
बार्सिलोना क्लबने त्यांच्या माजी स्टार खेळाडू मेस्सी याची 10 नंबरची जर्सी 18 वर्षीय युवा खेळाडू अन्सू फाती हाती सोपविली आहे. अन्सृसाठी ही मोठी सन्मानाची बाब ठरली आहे. बार्सिलोना क्लब बरोबरचे 21 वर्षाचे नाते संपवून स्टार खेळाडू लियोनेल मेस्सीने क्लबला अलविदा केला असला तरी त्याने त्याच्यामागे एक विरासत सोडली आहे ही निश्चित. याच विरासतीचा एका भाग असलेली त्याची 10 नंबरची जर्सी रिटायर्ड केली जाणार की अन्य खेळाडू ला दिली जाणार या बद्दल जाणून घेण्यास फुटबॉल प्रेमी फार उत्सुक होते.
फुटबॉल मध्ये 10 नंबरची जर्सी फार महत्वाची मानली जाते आणि या नंबरची जर्सी घालणारा खेळाडू त्याच योग्यतेचा असावा लागतो. बार्सिलोना क्लब मेस्सीनंतर या नंबरची जर्सी रिटायर्ड करेल म्हणजे यापुढे ती कुठल्याच खेळाडूला दिली जाणार नाही अशी शक्यता वर्तविली जात होती.
अन्सृ फाती सध्याचा सर्वात वेगवान आणि हुशार खेळाडू मानला जातो. ला लीगा 2020-21 मध्ये सात सामन्यात त्याने चार गोल केले आहेत. बार्सिलोनाचा स्टार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. गेल्या सिझन मध्ये तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर होता मात्र आता तो पुनरागमनाच्या तयारीत आहे असे समजते.