पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

नवी दिल्ली

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती लसीकरण मोहिमेत महत्वपूर्ण टप्पा गाठत भारतात लसीकरणाअंतर्गत काल 1 कोटीहून अधिक कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 5 दिवसात भारताने दोन वेळा हे यश प्राप्त केले आहे. आज सकाळी 7 पर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये 1,33,18,718 लसीच्या मात्रा देत भारताच्या कोविड -19 लसीकरणाने 65.41 कोटी (65,41,13,508) लसींच्या मात्रा देणे पूर्ण करत मागील संख्येला मागे टाकले आहे. हे लसीकरण 69,06,357 सत्रांच्या द्वारे साध्य झाले आहे. संपूर्ण देशात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची गतीमानता वाढवणे आणि देशभरात मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासांत 33,964 रूग्ण कोविडमुक्त झाले त्यामुळे कोविड संसर्गातून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या सुरुवातीपासून) 3,19,93,644 झाली आहे. परिणामी, भारताचा रोगमुक्ती दर 97.51मआहे.

केंद्र आणि राज्येकेंद्रशासित प्रदेश यांच्याद्वारे केल्या गेलेल्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे, आता सलग 66 व्या दिवशी 50,000 पेक्षा कमी दैनंदिन नवीन रूग्णांची नोंदणी झाली आहे. गेल्या 24 तासांत 41,965 नवीन कोविडग-स्त रूग्णांची नोंद झाली. देशातील सध्याची कोविड सक्रिय रुग्णसंख्या 3,78,181 इतकी आहे. ही संख्या सध्या देशातील एकूण सक्रीय रुग्णांच्या 1.15म आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 16,06,785 कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकूण 52.31 कोटी (52,31,84,293)कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात कोविड चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार होत असताना, सध्या साप्ताहिक सकारात्मकता (पाँझिटिव्हिटी) दर 2.58म असून हा दर गेल्या 68 दिवसांपासून 3म पेक्षा कमी राहिला आहे . दैनंदिन सकारात्मकता दर 2.61मआहे. सलग 86 दिवसांपासून दैनंदिन सकारात्मकता दर 5म च्या खाली राहिला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!