अटल पेन्शन योजनेसाठीच्या नोंदणीसंख्येने ओलांडला 3.30 कोटींचा टप्पा
नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या आणि निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण- झऋठऊअ मार्फत चालवल्या जाणार्या अटल पेन्शन योजना, या निवृत्तीवेतनाची हमी देणार्या योजनेअंतर्गत, चालू आर्थिक वर्षात तब्बल 28 लाख नवी खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत, एकंदर झालेल्या नोंदणी संख्येने, 25 ऑॅगस्ट 2021 रोजी 3.30 कोटींचा टप्पा ओलांडला.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत 25 ऑॅगस्ट 2021 पर्यंत उघडण्यात आलेल्या एकूण खात्यांपेकी सुमारे 78म ग-ाहकांनी 1,000 रुपयांची पेन्शन योजना तर, 14म ग-ाहकांनी 5,000 रुपयांची पेन्शन योजना निवडली आहे. तसेच, यात 44म टक्के महिला ग-ाहक असून 44म ग-ाहक अत्यंत तरुण म्हणजेच, 18-25 वर्षे वयोगटातील आहेत.
अलीकडच्या काळात, निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने या योजनेत काही नवे उपक्रम राबवले असून, त्यात, एपीवाय मोबाईल अॅप सुरु करत, उमंग प्लॅटफॉर्मवर ते उपलब्ध करुन देणे, एपीआय संबंधित वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांचे अद्ययावतीकरण, एपीवाय ग-ाहकांना या योजनेविषयीची सर्व माहिती 13 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होईल, हे सुनिश्चित करणे, जेणेकरुन सध्या असलेल्या आणि अपेक्षित एपीवाय ग-ाहकांपर्यंत योजनेची माहिती पोचून त्यांना त्याचा लाभ घेणे शक्य होईल, यांची तजवीज करणे, अशा उपाययोजना केल्या आहेत.
वाढत्या नोंदणीमुळे उत्साहित होऊन, निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने, देश आणि राज्य पातळीवर अटल पेन्शन योजनेविषयी जनजागृती करणारे कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्यक्रम देश आणि राज्य पातळीवर राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि राष्ट्रीय ग-ामीण उपजीविका मिशनच्या समन्वयाने आयोजित केले जातील. याविषयी मुद्रित, समाज आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जाहिराती दिल्या जातील. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अटल पेन्शन योजनेत एकूण नोंदणी नव्या उच्चांकावर नेऊन भारताला अधिकाधिक लोकांना निवृत्तीवेतन उपलब्ध असणारा समाज बनवण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील.
अटल पेंशन योजने विषयी माहिती :
अटल पेंशन योजनेत 18-40 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक, त्यांच्या बँक अथवा आपले बचत खाते असलेल्या टपाल खात्याच्या शाखांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. या योजनेअंतर्गत, ग-ाहकांना, वयाच्या 60 वर्षांनंतर, त्यांच्या योगदानानुसार महिना 1,000 ते 5,000 रुपये निवृत्तीवेतन मिळेल.
विविध बँका आणि टपाल विभागाच्या 266 अटल पेंशन योजना सेवा प्रदात्यांमार्फत ही योजना वितरीत केली जाते.