टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेते निषाद कुमार यांना क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले सन्मानित ; पंतप्रधानांच्या अथक पाठिंब्याने खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे – अनुराग ठाकूर
नवी दिल्ली
टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेते श्री निषाद कुमार आज दिल्लीत दाखल झाल्यानंतर ,केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी त्यांना सन्मानित केले. राज्यमंत्री श्री निसीथ प्रामाणिक यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.हिमाचल प्रदेशातील निशाद यांनी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी टी 47 प्रकारात 2.06 मीटर उंच उडी मारून रौप्य पदक पटकावले.
कार्यक्रमात बोलताना श्री. ठाकूर म्हणाले, ‘आपल्या पॅरालिम्पियन्सच्या चमकदार कामगिरीमुळे भारत अत्यानंदी आहे. भारताने पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकली आहेत ! आपण या वर्षी पॅरालिम्पिकसाठी सर्वात मोठा चमू पाठवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या दृष्टीने, भारताच्या पॅरालिम्पियन्सना सुविधा आणि निधी पुरविण्यासह सरकारचे पाठबळ कायम राहील. निषाद हे हिमाचल प्रदेशाचे असल्यामुळे माझ्याकडे निषाद यांच्या यशाने आनंदित होण्याचे एक अतिरिक्त कारण आहे.”
रौप्य पदक विजेते श्री निषाद कुमार म्हणाले की ,मी पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले यावर विश्वास बसत नव्हता.मी आधी चार अधिकार्यांना विचारणा केली, त्यांनतर मी या गोष्टीवर खरोखर विश्वास ठेवू शकलो.
निषाद यांनी या वर्षाच्या सुरुवातीला 2.06 मीटर उडीसह स्थापित केलेल्या आशियाई विक्रमाशी त्यांनी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत बरोबरी केली. प्रशिक्षक सत्यनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या बंगळुरू येथील राष्ट्रीय शिबिरात प्रशिक्षण घेत आहेत.पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पूर्वी परदेशात खेळण्याच्या संधीसाठी दौरा आणि चारहून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी,लक्ष्य ऑॅलिम्पिक पोडियम योजना (टिओपीएस) अंतर्गत 10.50 लाख रुपये आणि प्रशिक्षण आणि स्पर्धा वार्षिक कॅलेंडर (एसीटीसी ) अंतर्गत 10.21 लाख रुपयांचे यथायोग्य पाठबळ भारत सरकारने निषाद यांना दिले आहे.
महामारीच्या आधी दुबईतील फज्जा पॅरा ?थलेटिक्स ग-ँड प्रिक्समध्ये उंच उडी टी 47 प्रकारात निषाद यांनी सुवर्णपदक जिंकले होते. 2021 मध्ये देखील त्यांनी सुवर्ण जिंकून त्याच स्पर्धेत पराक्रमाची पुनरावृत्ती केली.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले निषाद फक्त आठ वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबाच्या शेतात गवत कापण्याच्या यंत्रामुळे त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. मात्र,या घटनेमुळे त्यांनी त्यांच्यातील धैर्याला डगमगू दिले नाही. दोन वर्षांनंतर, त्यांनी आपल्या शाळेच्या मैदानावर उंच उडीचा सराव करायला सुरवात केली. निषाद यांनी 2017 मध्ये शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या खेळाडूंसह शालेय राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला, जिथे त्यांनी 1.75 मीटर उडीसह 10 वे स्थान मिळवले.