देशात लसीकरणाचा ’महाविक्रम’; आरोग्यमंत्र्यांनी टवीट करत दिली माहिती

नवी दिल्ली,

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती घेतली आहे. देशात शुक्रवारी (31 ऑगस्ट) एकाच दिवशी जवळपास 1.09 कोटीपेक्षा अधिक नागरिकांचे संध्याकाळी पाच पर्यंत कोविड-19 लसीकरण करण्यात आले असून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. एका दिवसातील आतापर्यंतचा हा उच्चांक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री

मनसुख मंडावीया यांनी टवीट करत दिली आहे.

भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आज 1.09 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आरोग्यमंत्र्यानी टवीट करत देशातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे. आतपर्यंत एका दिवसातील लसीकरणाच्या आकडेवारीतील ही सर्वात जास्त संख्या आहे.

आरोग्यमंत्री मनसुख मडाविया म्हणाले, देशातील लसीकरणाच्या या विक्रमाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ञ्च्डरलज्ञेतरललळपशर्चीषींतरललळहा अभियानाला जाते. मोदींचे प्रयत्न आणि सातत्याने श्रम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांचं आहे. देशात दिवसेंदिवस लसीकरणाची संख्या वाढत आहे. यासाठी सर्व भारतीय नागरिकांचे अभिनंदन

कोविन वेबसाईटच्या आकडेवारीनुसार देशात 65 कोटी 3 लाख 29 हजार 061 नागरिकांना लस देण्यात आली आहे. यापैकी 50 कोटी 12 लाख 44 हजार 655 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर 14 कोटी 90 लाख 84 हजार 406 नागरिकांना कोरोनाचे दोन डोस देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!