केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृति इराणी यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातच्या केवडिया इथे राज्येकेंद्रशासित प्रदेशांची राष्ट्रीय परिषद

नवी दिल्ली,

या परिषदेमधून, ‘सुपोषित भारत’चे आमचे उद्दिष्ट प्राप्त करण्याचा आमचा संकल्प अधिकच दृढ होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या समन्वयित प्रयत्नांतूनच हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृति इराणी यांच्या अध्यक्षतेखाली, गुजरातच्या केवडिया इथे होणार्‍या या परिषदेला महिला आणि बालविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ महेंद्रभाई मुंजापारा देखील उपस्थित राहतील. विविध राज्यांचे, महिला आणि बाल विकास विभागाचे मंत्री, अतिरिक्त मुख्य सचिवप्रधान सचिवसामाजिक कल्याण विभागांचे मुख्य सचिव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेतील मुख्य कार्यक्रम उद्या म्हणजेच 31 ऑगस्ट 2021 रोजी, स्टॅच्यु ऑफ युनिटी इथे, भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहून सुरु होईल.. त्यानंतर, प्रत्येक राज्यातील महिला आणि बाल विकास मंत्र्यांच्या हस्ते, एका पोषक आहार वनस्पतीचे रोपटे लावले जाईल. हा उपक्रम, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेचे मूर्त स्वरूप असेल. तसेच, देशभरात, पोषण वाटिका लावण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरेल.

महिला आणि बालविकास मंत्री स्मृति झुबिन इराणी यांचे या परिषदेत मुख्य भाषण होईल. देशभरातील महिला आणि बालकांच्या भविष्याविषयीचा आपला दृष्टिकोन त्या या भाषणातून मांडतील. डॉ राज्यमंत्री डॉ महेंद्रभाई मुंजापारा देखील यावेळी आपले विचार मांडतील.

या परिषदेत, मंत्रालयाच्या तिन्ही अभियानांविषयी स्वतंत्र सादरीकरण केले जाईल. यात राज्येकेंद्रशासित प्रदेशांना या अभियानांची अंमलबजावणी करतांना येणार्‍या अडचणी आणि आव्हानांवर भर दिला जाईल. प्रत्येक सादरीकरणानंतर, राज्येकेंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आपला प्रतिसाद देतील आणि त्यावर चर्चा केली जाईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!