जन्माष्टमीनिमित्त उपराष्ट्रपतींनी जनतेला दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली,

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी जनतेला जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

‘जन्माष्टमीच्या पवित्र प्रसंगी मी देशवासियांना शुभेच्छा देतो.भगवान विष्णू यांचा आठवा अवतार म्हणून पुजल्या जाणार्‍या भगवान कृष्ण यांचा जन्म, जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. फळाची अपेक्षा न बाळगता आपले कर्म चोखपणे करत राहा हा श्रीमद् भगवद् गीतेत भगवान श्रीकृष्णानी विषद केलेला चिरंतन संदेश, संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी राहिला आहे.

आपले कर्तव्य निष्ठेने बजावत राहण्याचा आणि योग्य मार्गावरून चालत राहण्याचा पुन्हा निर्धार करू या.

जन्माष्टमी देशभरात पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते मात्र महामारी लक्षात घेता सावधगिरी बाळगत, कोविड नियमावलीचे पालन करत आपण साधेपणाने उत्सव साजरा करण्याची आवश्यकता आहे. ही जन्माष्टमी आपल्या देशात शांतता, सलोखा आणि भरभराट आणणारी ठरो’ असे उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!