गेल्या 24 तासांत जगभरातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद भारतात, 7766 सक्रिय रुग्ण वाढले
नवी दिल्ली,
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. काल दिवसभरात जगातील सर्व दैशांपैकी सर्वाधिक कोरोनाबाधित भारतात आढळून आले आहेत. सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 42,909 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच 380 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. अशातच गेल्या 24 तासांत 34,763 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
वर्ल्डोमीटर वेबसाईटनं दिलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात भारतात सर्वाधित कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अमेरकेत 37262, बि-टनमध्ये 33196, इराणमध्ये 31516, जपानमध्ये 22748 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रशिया, मेक्सिको, इराण, इंडोनेशियात भारताहून कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 27 लाख 37 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 38 हजार 210 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 19 लाख 23 हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 76 हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.
कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 27 लाख 37 हजार 939
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 19 लाख 23 हजार 405
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 76 हजार 324
एकूण मृत्यू : चार लाख 38 हजार 210
एकूण लसीकरण : 63 कोटी 43 लाख 81 हजार लसीचे डोस