कोहली, पुजारा आणि रहाणेला शतक करताना पाहू इच्छितो – इंजमाम

नवी दिल्ली,

भारतीय क्रिकेट संघातील कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे सारखे खेळाडू मोठी धावसंख्या करु शकले नाहीत तर संघ दबावामध्ये येत राहिल असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकने व्यक्त केले.

भारतीय संघाचा कर्णधार कोहली आणि फलंदाज पुजाराने जवळपास दोन वर्षा पासून शतक केलेले नाही तर रहाणेने शेवटचे शतक मागील वर्षी डिसेंबरमध्ये केले होते. पुजाराने इंग्लंड विरुध्द हेडिंग्लेंमध्ये खेळण्यात आलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यातील दुसर्‍या डावात 91 आणि कोहलीने 55 धावा केल्या होत्या.

आपल्या यू-टयूब चॅनलवर इंजमामने म्हटले की जर आपण भारताच्या फलंदाजी लाइनअपला पाहतोत तर कोहलीने जवळपास दोन वर्षा पासून शतक केलेले नाही आणि असेच काहीसे पुजारा आणि राहणे बाबत आहे. ॠषभ पंतने धावा केल्या आणि रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विननेही योगदान दिले आहे. या अनुभवी खेळाडूंच्या तुलनेत युवा खेळाडूनी जास्त योगदान दिले आहे 

इंजमामच्या मते ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या मालिके पासून भारतासाठी तळातील क्रमांकावरील फलंदाजानी जास्त योगदान दिले आहे.

त्याने म्हटले की मोठया मालिकेत जर भारताच्या अनुभवी खेळाडू जो पर्यंत समोर येऊन नेतृत्व करणार नाहीत तो पर्यंत संघ अडचणीने घेरला जाईल. मी भारतीय संघाचे प्रदर्शन ऑस्ट्रेलिया पासून पाहत आलो आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कसोटी क्रिकेट खेळले आहे. भारतीय संघाने मुश्किल स्थितीमध्ये घराच्या बाहेर मालिका जिंकली आहे. परंतु या मालिकेत युवकांनी मोठी भूमिका निभावली आहे.

इंजमामने म्हटले की कोहली जगातील क्रमांक एकचा खेळाडू आहे. पुजारा आणि रहाणे चांगले कसोटी खेळाडू आहेत. परंतु जर त्यांच्या शतकामध्ये मोठे अंतर राहिले तर युवा खेळाडू दबावामध्ये येतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!