न्यूज ऑॅन एआयआर रेडीओ लाईव्ह स्ट्रीम इंडिया रँकिंग

नवी दिल्ली,

ऑॅल इंडिया रेडीओचे लाइव्ह स्क्रीमिंग म्हणजेच थेट प्रसारण ज्या शहरांमध्ये लोकप्रिय आहे, अशा पहिल्या काही शहरांतील क्रमवारीच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबई, दिल्ली एनसीआर आणि जयपूर या शहरांनी चेन्नई आणि अहमदाबादला मागे टाकत लोकप्रियतेत वरचे स्थान पटकावले आहे.

भारतातील एआयआर स्ट्रीम च्या सर्वाधिक लोकप्रिय शहरांच्या क्रमवारीत मोठा बदल म्हणजे, एआयआर कोडाईकनालने याआधी गाठलेले आठवे स्थान गमावत पुन्हा त्याची दहाव्या स्थानी घसरण झाली आहे. तर एआयआर कोचि एफएम रेनबो आणि एफएम रेनबो दिल्ली दोन्ही वाहिन्या प्रत्येकी एक स्थान वर गेल्या आहेत.

स्ट्रीम्स मध्ये पहिल्या सर्वाधिक लोकप्रिय शहरांच्या यादीत, रेनबो कन्नड कामनबिलू, पुणे आणि मुंबईत विशेष लोकप्रिय आहे, तर एफएम गोल्ड दिल्ली वाहिनी, बंगळूरु, मच्छगन, कोलकाता आणि हैदराबाद या शहरात अधिक ऐकली जाते.

न्यूज ऑॅन एआयआर या अ?ॅप वर आकाशवाणीच्या 240 पेक्षा अधिक वाहिन्या-सेवांचे थेट प्रसारण केले जाते. न्यूज ऑॅन एआयआर या अ?ॅपला मोठा श्रोतृवर्ग असून जागतिक पातळीवर देखील हे अ?ॅप लोकप्रिय आहे. जगभरात 85 देश आणि 8000 शहरात, या अ?ॅपचे श्रोते आहेत.

आकाशवाणीच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण न्यूज ऑॅन एआयआर या अ?ॅपच्या माध्यमातून सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या क्रमवारीतील काही सर्वोच्च शहरांकडे एक नजर टाकूया. भारतातही न्यूज ऑॅन एआयआर अ?ॅपची लोकप्रियता आणि शहरनिहाय स्थिती आपल्याला खालील तक्त्यात बघता येईल. ही क्रमवारी एक ऑॅगस्ट ते 15 ऑॅगस्ट या पंधरवड्यातील आकडेवारीवर आधारित आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!