प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोडले टीकेचे बाण

नवी दिल्ली,

डॉ. प्रवीण तोगडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वाद सर्व देशाला माहित आहे. प्रवीण तोगडिया 2011 ते 2018 पर्यंत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होते. प्रवीण तोगडिया यांनी विश्व हिंदू परिषदेत असताना अशोक सिंघल यांच्यासोबत राम मंदिर आंदोलनात मोलाची भूमिका बजावली होती. पण त्यांना जून 2018 मध्ये संघटनेपासून दूर करण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नावाची वेगळी संघटना त्यांनी तयार केली. प्रवीण तोगडिया आपल्या संघटनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित भाजपाच्या धोरणांवर टीकेचे बाण सोडतात, त्याचप्रमाणे प्रवीण तोगडिया यांनी आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बाजूला बसतच नाही. बसले तर समजवू शकतो ना, राम मंदिरच्या सुरुवातीला बाबरी मशिदीसाठी लढणारा अन्सारी त्यांना प्रिय वाटतो. पण राम मंदिरासाठी लढणारा प्रवीण तोगडिया आवडत नाही. त्यांना बाबूंनी बिघडवले. ते खूप चांगले व्यक्ती होते, असा मिश्किल टोला प्रवीण तोगडिया यांनी लगावला.

त्याचबरोबर भारताचा इकॉनॉमिक मॉडेल आता बदलावा लागेल. यापूर्वी आता आपला जीडीपी खाली आला आहे. पण तो वाढत होता. एक टक्का जीडीपी वाढला, तर एक कोटी रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत. हे आंतरराष्ट्रीय गणित आहे. भारतात जे मॉडेल आहे. एक टक्का जीडीपी वाढताच एक कोटी रोजगार तयार होत नाहीत. ही जॉबलेस ग-ोथ आहे. जेव्हा जीडीपी वाढतो, तेव्हा सरकारच्या कराच्या माध्यमातून मिळकत वाढते, असे मत एबीपी माझ्याशी बोलताना प्रवीण तोगडिया यांनी मांडले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!