‘कू’ ची युजर संख्या कोटी पार
नवी दिल्ली,
स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साईट ‘कू’ ची युजर संख्या 1 कोटीपार गेली आहे. पुढच्या वर्षात ही संख्या 10 कोटींवर नेण्याचे लक्ष ठेवले असल्याचे कंपनीचे सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्ण यांनी सांगितले. ते म्हणाले, ही अजून सुरवात आहे. आज इंटरनेटचा वापर करणार्यांच्या संख्येत फक्त 2 टक्के युजर मायक्रोब्लॉगिंगचा वापर करतात. फक्त इंग-जी पाहिले तर ही संख्या 2 टक्के इतकी सीमित आहे. म्हणजे 98 टक्के युजरना अजून मायक्रोब्लॉगिंग काय याची कल्पना नाही. आणि याच वर्गावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.
टिवटरला स्पर्धा म्हणून कू ची सुरवात झाली असून सुरवातीचा सव्वा दीड वर्षात युजर संख्या 1 कोटीपेक्षा अधिक झाली आहे. फेब-ुवारी महिन्यातच 85 लाख डाऊनलोड झाले आहेत. आज घडीला 70 कोटी लोक इंटरनेटचा वापर करत आहेत. त्या सर्वाना आम्ही ‘तुमच्या मनातील गोष्टी कू वर करू शकता’ हे पटविण्याचा प्रयत्न करतो आहोत असेही अप्रमेय म्हणाले.
या प्रवासात अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. गतवर्षी हिंदी, तेलगु, बंगाली सह अन्य भारतीय भाषांचा सपोर्ट कू ला मिळाला आहे. टिवटर आणि केंद्र सरकार यांच्यात वाद झाल्यावर या स्वदेशी डिजिटल मंचाला वाढती मागणी आहे. कू ची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. अनेक केंद्रीय मंत्री, सरकारी अधिकारी, सेलेबि-टी आणि काही परदेशी सरकारे याचा वापर करत आहेत. स्थानिक कायदे आणि नियम पाळून आम्ही व्यवसाय करतो आहोत असेही अप्रमेय यांनी स्पष्ट केले.