टिवीटर अकाउंट परत सुरु झाल्या पासून राहुल गांधीचे फक्त दोन टिवीट

नवी दिल्ली,

सोशल मीडिया प्लेफॉर्म टिवीटरकडून अकाउंट परत एकदा सुरु केल्या गेल्यानंतर राहुल गांधीनी आता पर्यंत फक्त दोन वेळा टिवीट केले आहे.

खात्याच्या तपशिलानुसार राहुल गांधीनी टिवीटर अकाउंट परत एकदा सुरु झाल्यानंतर संपत्ती मुद्रीकरण योजनेवरुन सरकारवर हल्ला करण्यासाठी बुधवारी टिवीटचा वापर केला.

काँग-ेस सूत्रांनी सांगितले की काँग-ेसच्या माजी अध्यक्षांचा टिवीटरवरील विश्वास कमी झाला आहे आणि ते आता फेसबुक, इंस्टाग-ाम आणि अन्य सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर जास्त विश्वास करत आहेत. ते फेसबुकवर लिहित आहेत आणि या मंचावर ओणमच्या शुभेच्छा देत आहेत.

काँग-ेसच्या अन्य नेत्यांचे टिवीटर हँडल आणि पक्षाच्या अधिकृत टिवीटर हँडललाही ब्लॉक केले गेले होते. परंतु अनलॉक झाल्यानंतर आता सर्वजण सक्रिय आहेत.

टिवीटरने 14 ऑगस्टला काँग-ेस, राहुल गांधी आणि अन्य लोकांचे खाते हे टिवीटरच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल अस्थायीपणे बंद केले होते परंतु नंतर हे खाते परत एकदा अनलॉक करण्यात आले होते. काँग-ेसने आरोप केला होता की सरकारच्या इशार्‍यावरुन असे करण्यात आले होते.

सूत्रांनुसार टिवीटरने अकाउंटस तर अनलॉक केले आहे परंतु जुन्या टिवीटसला होल्डवर ठेवले आहे. राहुल गांधीनी एका व्हिडीओतून निवेदन प्रसिध्द करुन टिवीटरवर त्यांच्या अकाउंटला ब्लॉक करण्याचा आरोप केला होता आणि आरोप केला होता की सोशल मीडिया प्लेटफॉर्म देशातील राजकारणात पक्ष घेत आहे.

त्यांनी म्हटले होते की माझ्या टिवीटरला बंद करुन आमच्या राजकिय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत आहेत. एक कंपनी आमच्या राजकारणाला परिभाषीत करण्यासाठी आपला व्यवसाय करत आहे . एका राजकिय नेत्याच्या रुपात मला हे पसंत नाही. हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला असून हा राहुल गांधीवर हल्ला नाही.

त्यांनी म्हटले की त्यांचेे 19 ते 20 दशलक्ष फॉलोव्हर्स आहेत आणि मला एक मत मांडण्याच्या अधिकारा पासून वंचित करण्यात आले आहे. यामुळे हे फक्त स्पष्टपणे अनुचित असून टिवीटर हे एक तटस्थ मंच आहे हे त्यांच्या विचाराचेही उल्लंधन आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!