धक्कादायक! जेएनयूच्या कॅम्पसमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

नवी दिल्ली,

विविध आंदोलनांनी चर्चेत येणार्‍या दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठात धक्कादायक घटना घडली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (व्र्‍ळ) कॅम्पसमध्ये महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला आहे. ही घटना समजताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जेएनयूमध्ये मृतदेह आढळलेल्या महिलेचा पती विद्यापीठात पीएचडी करत आहे. मृतावस्थेत आढळलेली महिला ही ब-ह्मपुत्रा होस्टेलमध्ये राहत होती. होस्टलेच्या दुसर्‍या मजल्यावरून महिलेने उडी घेतल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी वसंत कुंज नॉर्थ पोलीस तपास करीत आहेत.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या एका गटावर ग-ंथालयात तोडफोड केल्याचा आणि कर्मचार्‍यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. जेएनयू प्रशासनाने आरोपी विद्यार्थ्यांविरूद्ध 10 जुन 2021 रोजी गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठाच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!