कोरोनाचा नवीन सुपर व्हेरिअंट डेल्टापेक्षाही अधिक धोकादायक

नवी दिल्ली

पुढील वर्षी कोरोनाचा आणखी एका नव्या ‘सुपर व्हेरिअंट’ चा प्रादुर्भाव वाढणार असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या डेल्टा व्हेरिअंटपेक्षाही हा व्हेरिअंट अधिक धोकादायक असून ज्यांचे अद्यापपर्यंत लसीकरण झालेले नाही, असे लोक याचे सुपर स्प्रेडर्स बनण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्याचबरोबर भारतात अद्यापही 12 वर्षाखालील मुलांचे लसीकरण न करण्यात आल्यामुळे येत्या काळात हा वयोगट कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा सुपर स्प्रेडर्स ठरु शकतो, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

या व्हेरिअंटबाबत संसर्गतज्ज्ञ प्रो. साई रेड्डी सांगतात की, सध्याच्या डेल्टा प्लस आणि इतर कोरोनाच्या इतर व्हेरिअंटपासून एक नवीन आणि अधिक धोकादायक व्हेरिअंट निर्माण होण्याची शक्यता असून देशात आणि जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा मोठा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे अनेक देशांतील परिस्थिती अत्यंत बिकट बनली होती. त्यातच आता नव्याने येत असलेल्या व्हेरिअंटचा प्रादुर्भाव हा त्यापेक्षाही अधिक धोकादायक असण्याची शक्यता असल्यामुळे येत्या काही वर्षात केवळ एकदाच कोरोनाची लस घेऊन उपयोग होणार नाही, तर अधिक लसी घ्याव्या लागतील.

या नवीन व्हेरिअंटची शक्ती एकापेक्षा अधिक लसीच कमी करु शकतील आणि त्याच्या प्रादुर्भावाविरोधात सक्षण लढा देऊ शकतील. कोरोनाच्या आगामी नविन व्हेरिअंटशी लढायचे असेल, तर आपल्याला केवळ एकाच लसीवर अवलंबून राहून चालणार नाही. एकापेक्षा अधिक लसी आणि त्याही पलिकडे जाऊन इतर उपाय देखील शोधावे लागतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!