34 कोटी रुपयांच्या हेराफेरी प्रकरणात देवेश कुमारांना ईडीकडून अटक
नवी दिल्ली,
श्री महाराणी स्टिलचे मालक देवेश कुमारांना बिहारच्या जमालपूरमधील ईस्टर्न रेल्वे वर्कशॉपमध्ये खराब पडलेल्या व्हॅगन आणि व्हिल सेटांंमध्ये हेराफेरीतील सहभागाच्या आरोपामध्ये केंद्रिय प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने मंगळवारी अटक केली.
ईडीने येथे एका निवेदनात म्हटले की कुमारांना 13 ऑगस्टला श्री महाराणी स्टिल्सच्या प्रकरणात धन शोधन निवारण अधिनियमाच्या कलमा अंतर्गत अटक करण्यात आली.
ईडीने म्हटले की कुमारवर पूर्व रेल्वेच्या जमालपूर वर्कशॉच्या 34 कोटी रुपयांच्या खराब व्हॅगन आणि व्हिल सेट व अन्य अपव्हर्जित फिटिंगच्या हेराफेरीत सहभागी होण्याचा आरोप आहे.
ईडीने पटण्यातील श्री महाराणी स्टिल्स इस्टर्न रेल्वे जमालपूरच्या अज्ञात अधिकारी आणि अज्ञात खाजगी व्यक्तींच्या विरोधात पूर्व रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आणि सतर्कता अधिकार्याद्वारा प्रसिध्द एक तक्रारपत्र आणि सीबीआयद्वारा नोंदविलेल्या एका प्राथमिकीच्या आधारावर गुन्हा नोंदविला आहे.
तक्रार पत्रात आरोप करण्यात आला की जमालपूरमध्ये पूर्व रेल्वेच्या धोबी घाटा साइडिंगमधून खराब व्हॅगन आणि अन्य अपवर्जित फिटिंगला निपटण्यात हेराफेरी आणि अनियमितता आढळून आल्या.
पूर्व रेल्वेच्या सतर्कता विभागाद्वारा करण्यात आलेल्या एका निवारक तपासाच्या दरम्यान 100 बेकार व्हॅगन आणि 3,220 प्रसिध्द करण्यात आलेले व्हिल सेटो बरोबरच अन्य अपवर्जित फिटिंग बरोबरच जवळपास 34 कोटी रुपयांचा शुध्द मूल्याचे एक बाहेरील खाजगी संस्था आणि लिलाव खरेदीदार कुमारच्या मालिकाद्वारा चूकीच्या पध्दतीने वापर करण्यात आले आहे.
श्री महाराणी स्टिलने पूर्व रेल्वेतील अज्ञात रेल्वे अधिकारी आणि अन्य अज्ञात खाजगी व्यक्ती बरोबर साठगांठ केली होती.
तपासा दरम्यान कुमारने तपासामध्ये असहयोग केला आणि अनेक माहितीला सांगितले नाही. त्याला 13 ऑगस्टला अटक करण्यात आली होती आणि 23 ऑगस्ट पर्यंत सात दिवस ईडीच्या ताब्यात पाठविले गेले.