उपराष्ट्रपतींनी नद्या आणि जलाशयांच्या पर्यावरणीय महत्वाबाबत लोकांना जाणीव करून देण्याच्या गरजेवर दिला भर
लोकांना जलाशय प्रदूषित न करण्याचे केले आवाहन
नवी दिल्ली –
उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी नद्या आणि जलाशयांच्या पर्यावरणीय महत्वाबाबत लोकांना जाणीव करून देण्याच्या गरजेवर भर दिला आणि जलसाठे प्रदूषित न करण्याचे आवाहन केले.
कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील होस्पेट येथील तुंगभद्रा धरणाला भेट दिल्यानंतर एका फेसबुक पोस्टमध्ये, उपराष्ट्रपतींनी भावी पिढ्यांसाठी आपल्या मर्यादित जलसंसाधनांचे जतन आणि संवर्धन करण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, “नदीचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि आपण तिची शुद्धता आणि पावित्र्य अबाधित ठेवण्याचा संकल्प करूया.”
सर्व शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवण्याच्या गरजेचा पुनरुच्चार करत नायडू म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतीसाठी पाण्याचे महत्त्व आपण जाणतो.
तुंगभद्रा धरण आणि त्याच्या नैसर्गिक परिसराचा उल्लेख करताना नायडू म्हणाले की, निसर्गाच्या ‘विराट स्वरूप’ची भव्यता आणि विशालता पाहून ते भारावून गेले.