सीप्झ (डएएझन ) च्या नूतनीकरण आणि पुनर्बांधणीवर 200 कोटी रुपये खर्च केले जातील: वाणिज्य मंत्री पीयूष गोयल

नवी दिल्ली,

सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्रातून बाहेर पडू इच्छिणार्‍या कंपन्यांना कालबद्ध पद्धतीने बाहेर पडण्यासाठी आणि नवीन कंपन्यांना त्यांचे स्थान घेण्यास सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार धोरण आखत आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. निर्यात वाढवण्याच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी मुंबईत निर्यात प्रोत्साहन परिषद, कमोडिटी बोर्ड आणि प्राधिकरण आणि इतर हितधारकांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी हे नमूद केले.

सीप्झच्या विकास आयुक्तांना उद्योग क्षेत्राशी सल्लामसलत करून अत्यंत स्पर्धात्मक दरात सेवा प्रदान करण्यासाठी एक सामायिक सेवा केंद्र स्थापन करण्यास सांगितले आहे असे गोयल म्हणाले. फसीप्झमध्ये नव्याने सहभागी होणार्‍या कंपन्यांसाठी तसेच विद्यमान कंपन्यांना नवीन ठिकाणी हलवण्यासाठी, नवीन ठिकाणे तयार करण्यास सांगितले असून यासाठी टप्प्याटप्प्याने योजना आखली जाईल . सामायिक सेवा केंद्र सुविधा उभारण्यासाठी 50 कोटी आणि सीप्झच्या नूतनीकरण आणि पुनर्बांधणीवर अंदाजे 200 कोटी रुपये खर्च केले जातील. फ

सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (डएएझन) ची स्थापना 1 मे 1973 रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मिती आणि निर्यातीसाठी युनि-प्रॉडक्ट एझन म्हणून करण्यात आली. नंतर,केंद्र सरकारने 1987-88 दरम्यान सीप्झ मधून रत्न आणि दागिन्यांच्या वस्तूंच्या निर्मिती आणि निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. विविध प्रकारची नियंत्रणे आणि मंजुरी, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा अभाव, आणि अस्थिर वित्तीय व्यवस्था यामुळे निर्माण झालेल्या त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने; आणि भारतात मोठ्या परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी एप्रिल 2000 मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (डएनी) धोरण जाहीर करण्यात आले. डएएझन हे तीन निर्यात प्रक्रिया क्षेत्रांपैकी एक होते जे 1 नोव्हेंबर 2000 पासून विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून रूपांतरित करण्यात आले.

भारतीय तेलबिया आणि उत्पादने निर्यात प्रोत्साहन परिषद( आयओपीईपीसी), ईईपीसी इंडिया, प्लास्टिक निर्यात प्रोत्साहन परिषद (प्लेक्सकॉन्सिल), सेवा निर्यात प्रोत्साहन परिषद, सिंथेटिक अँड रेयॉन टेक्स्टाईल निर्यात प्रोत्साहन परिषद, यंत्रमाग विकास आणि निर्यात प्रोत्साहन परिषद, टेक्स्प्रोसिल, जेम अँड ज्वेलरी निर्यात प्रोत्साहन परिषद, ऍपारेल निर्यात प्रोत्साहन परिषद, सीआयआय, एफआयईओ( फेडरेशन ऑॅफ इंडियन एक्स्पोर्ट ऑॅर्गनायजेशन), प्रोजेक्ट एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सील ऑॅफ इंडिया आणि इतरांसह या बैठकीमध्ये निर्यात प्रोत्साहन परिषद, कमोडिटी बोर्ड आणि अधिकारी उपस्थित होते. निर्यात प्रोत्साहन परिषदा आणि इतर सहभागी मुंबईत प्रत्यक्ष उपस्थित होते तर इतर विविध ठिकाणांहून इतर सहभागी ऑॅनलाईन माध्यमांद्वारे उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!