भारतीय हवाई दलासाठी डीआरडीओने विकसित केले आधुनिक शाफ तंत्रज्ञान

नवी दिल्ली,

शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्याच्या धोक्यापासून लढाऊ विमानांचे संरक्षण करणारे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी तंत्रज्ञान उद्योगांकडे हस्तांतरित

तंत्रज्ञान वापराच्या यशस्वी चाचण्यांनंतर भारतीय हवाई दलाने वापर करण्याची प्रक्रिया सुरु केली केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या विकसनाला ‘आत्मनिर्भर भारताच्या’ दिशेने डीआरडीओने उचललेले आणखी एक पाऊल म्हटले

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्यापासून संरक्षण करण्यासाठी आधुनिक शाफ तंत्रज्ञान (उहरषष ढशलहपेश्रेसू) विकसित केले आहे. जोधपुर येथील संरक्षण प्रयोगशाळा आणि पुण्यातील एचईएमआरएल अर्थात उच्च उर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा या डीआरडीओच्या संस्थांनी एकमेकांच्या सहकार्याने भारतीय हवाई दलाच्या दर्जात्मक पात्रता पूर्ण करणारे शाफचे साहित्य आणि शाफचे 118घ् कार्ट्रीज तयार केले आहे.

सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या युगात, आधुनिक रडार तंत्रज्ञानाचे धोके वाढत असल्यामुळे लढाऊ विमानांचे संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय झाला आहे. विमानांना वाचविण्याची खात्री करून घेण्यासाठी इन्फ्रा-रेड आणि रडार यांच्या धोक्याला अप्रत्यक्षपणे पायबंद घालणारी सीएमडीएस ही प्रणाली वापरण्यात येते. शाफ हे शत्रूच्या रडारच्या धोक्यापासून वाचविणारे अत्यंत महत्त्वाचे संरक्षण तंत्रज्ञान आहे. यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात वापरलेले शाफचे साहित्य हवेत असताना शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशाभूल करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि आणि त्यायोगे आपल्या लढाऊ विमानांचे संरक्षण करणे शक्य होते. भारतीय हवाई दलाला दरवर्षी आवश्यक असलेल्या शाफचा पुरवठा व्हावा करण्याच्या उद्देशाने हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी उद्योगांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

या महत्वाच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे संशोधन केल्याबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ, भारतीय हवाई दल तसेच उद्योग क्षेत्राचे कौतुक करून याला ‘आत्मनिर्भर भारताच्या’ दिशेने डीआरडीओने टाकलेले आणखी एक पाऊल म्हटले आहे. भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत भर टाकणार्‍या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या यशस्वी शोधाशी संबंधित पथकांचे केंद्रीय संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.जी.सतीश रेड्डी यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!