भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये भूगर्भशास्त्राच्या क्षेत्रात सहकार्यासाठी केलेल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

पूर्व-हिमालय आणि लडाखचे पठार या भूभागाचे भूगर्भीय ज्ञान वृद्धींगत होणार

नवी दिल्ली, 18 ऑगस्‍ट 2021

भारतीय भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षणविभाग (GSI), भारत सरकारचे खाणकाम मंत्रालय आणि अमेरिकेच्या फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कला, विज्ञान आणि शिक्षण महाविद्यालयातील पृथ्वी आणि वातावरणीय विभागाच्या वतीने त्यांचे विश्वस्त मंडळ, यांच्यामध्ये भूगर्भशास्त्राच्या क्षेत्रातील सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

या करारातील दोन्ही सहभागींनी मान्यता दिलेली अभ्यासाची क्षेत्रे पुढीलप्रमाणे :

  1. भारत – आशिया या भागातील भूभागांच्या परस्परावर आदळण्यातून निर्माण होणाऱ्या चुंबकीय परिणामांमुळे पूर्व हिमालयाच्या पर्वतराजीतील भूगर्भशास्त्रीय आणि भूशास्त्रीय वातावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास व भूगर्भशास्त्रीय ज्ञान वृद्धींगत करणे.
  2. स्थानिक भूगर्भशास्त्रीय, भूरासायनिक, पेट्रोलॉजिकल आणि भूभाग एकमेकांवर आदळून निर्माण झालेल्या लडाख पठारासारख्या वैशिष्ट्यपूर्ण भागातील उत्क्रांतीशी संबंधित अनेक समस्थानिकांच्या अभ्यासाच्या क्षेत्रात सहकार्याने अभ्यासप्रकल्पांची उभारणी.
  3. तंत्रज्ञान आणि भू वैज्ञानिक माहितीची देवाणघेवाण
  4. दोन्ही बाजूंनी परस्पर सहमतीने ठरवलेली इतर क्षेत्रे

या सामंजस्य करारामुळे भारतीय भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण म्हणजेच जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI) आणि फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांना भूगर्भशास्त्राच्या क्षेत्रातील सहयोगासाठी संस्थात्मक व्यवस्था निर्माण होईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!