न्यूजऑॅनएअर रेडिओ थेट- प्रसारणातील भारतातील क्रमवारी
नवी दिल्ली,
न्यूजऑॅनएअर क्रमवारी ठरवताना विविध भारतीवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांची क्रमवारीचा देखील यात विचार केला गेला आहे. विविध भारती राष्ट्रीय वाहिनीवरील भूले बिसरे गीत, कुछ बताईये कुछ गीत आणि विविध भारती की रांगोली हे 3 सर्वात लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम आहेत.
भारतातील अव्वल शहरांच्या ताज्या क्रमवारीत जिथे न्यूजऑॅनएअर ?पवर ऑॅल इंडिया रेडिओ लाइव्ह-स्ट्रीम सर्वात जास्त लोकप्रिय आहे, तिथे पाटणाला यादीतून दूर सारत लखनौने प्रथमच अव्वल 10 मध्ये प्रवेश केला आहे.
भारतातील अव्वल एअर स्ट्रीमिंगच्या क्रमवारीत झालेल्या प्रमुख बदलांमध्ये, एफएम गोल्ड दिल्लीने 9 व्या क्रमांकावरून 6 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे तर रेनबो कन्नड कामनबिलू आणि एफएम रेनबो दिल्ली अनुक्रमे चौथ्या स्थानावरून 7 व्या आणि 7 व्या स्थानावरून 10 व्या स्थानावर घसरले आहेत.
प्रसार भारतीचे अधिकृत ?प असलेल्या न्यूज ऑॅन एअर ?पवर आकाशवाणीच्या 240 हून अधिक सेवांचे थेट प्रसारण होते. न्यूजऑॅन ?पवरील या ऑॅल इंडिया रेडिओ स्ट्रीममध्ये केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर 85 हून अधिक देश आणि जगभरातील 8000 शहरांमध्ये मोठ्या संख्येने श्रोते आहेत.
जिथे न्यूज ऑॅन एअर ?पवर आकाशवाणीचे थेट प्रसारण सर्वाधिक लोकप्रिय आहेत. भारतातील मुख्य शहरांवर एक नजर टाकूया. ही क्रमवारी 16 जुलै ते 31 जुलै 2021 या पंधरवड्याच्या आकडेवारीवर आधारित आहे.