कोविड-19 लसींची बॅच-चाचणी आणि लस जारी करण्यासाठी आणखी एका प्रयोगशाळेला मंजुरी
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कोविड-19 लसींचे उत्पादन, पुरवठा आणि प्रशासन सुधारण्यासाठी निरंतर आणि अथक प्रयत्न करत आहे. लसीकरणाची गती वाढवण्याच्या महत्त्वाच्या उपक्रमामध्ये, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड -19 लसींची चाचणी आणि लसीची खेप जारी करण्यासाठी आणखी एका प्रयोगशाळेला मंजुरी दिली आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड-19 लसींची चाचणी आणि लस जारी करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल बायोटेक्नॉलॉजीला (छखअइ) केंद्रीय औषध प्रयोगशाळा (उऊङ) म्हणून अधिकृत केले आहे.
भारतात कोविड -19 लसीकरण वितरणाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी 11 नोव्हेंबर 2020 रोजी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत मंत्रालये आणि जैव तंत्रज्ञान विभाग (ऊइढ), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) यांना त्यांची एखादी प्रयोगशाळा सीडीएल म्हणून वापरली जाऊ शकते का याबाबत आरोग्य मंत्रालयाला सूचित करण्यास सांगण्यात आले होते.
योग्य चर्चेनंतर जैव तंत्रज्ञान विभागाने छखअइ आणि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस (छउउड), पुणे या दोन प्रयोगशाळांचा प्रस्ताव दिला होता. या दोन प्रयोगशाळांचा दर्जा उंचावण्यासाठी पंतप्रधान केअर्स फंड ट्रस्ट (झच-उअठएड) मधून निधी देण्यात आला.
सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ने एनआयएबी, हैदराबादला सीडीएल प्रयोगशाळा म्हणून अधिसूचित करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला मसुदा अधिसूचना सादर केली होती, ज्याला प्रतिसाद देत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता एनआयएबी, हैदराबादला सीडीएल प्रयोगशाळा म्हणून अधिसूचित केली आहे.
हे नमूद करावे लागेल की पुण्याच्या एनसीसीएसला 28 जून 2021 रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सीडीएल प्रयोगशाळा म्हणून अधिसूचित केले आहे.
सीडीएल प्रयोगशाळा म्हणून या दोन प्रयोगशाळांच्या अधिसूचनेमुळे लसींचे उत्पादन सुधारेल आणि परिणामी लसीकरण मोहिमेला बळ मिळेल.