साठ देशांचा तालिबानकडे अफगाणिनीना देश सोडण्याची परवानगी देण्याचा आग्रह
नवी दिल्ली,
तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुल व अन्य राज्यांच्या राजधानींवर कब्जा केल्यानंतर 60 पेक्षा अधिक देशांनी तालिबानकडे लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर जाण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे. या बाबत या देशांनी एक संयुक्त निवेदनही प्रसिध्द केले आहे.
एका निवेदनात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले की बिघडत्या सुरक्षा स्थितीला पाहता आम्ही याचे समर्थन करतोत आणि लोकांना सुरक्षीत करण्यासाठी काम करत आहोत. सर्व पक्षांना सन्मान आणि सुविधेसाठी आवाहन करतोत आणि देश सोडणार्या विदेशी नागरीकांना व अफगाणिनीची सुरक्षीत व व्यवस्थीत प्रस्थान हवे आहे.
निवेदनानुसार अफगाण आणि आंतरराष्ट्रीय नागरीक जे प्रस्थान करु इच्छित आहेत त्यांना असे करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे. रस्ता, विमानतळ, आणि सीमांना उघडे ठेवले गेले पाहिजे आणि शांती कायम ठेवली गेली पाहिजे. अफगाणि लोक सुरक्षा आणि सन्मानासह ज्याचे ते हक्कदार आहेत आम्ही आंतररष्ट्रीय समुदायामध्ये त्यांच्या मदतीसाठी तयार आहोत.
निवेदनावर ज्या साठ देशांनी स्वाक्षरी केली त्यात अल्बानिया, ऑस्ट्रेलिया, बहामास, बेल्जियम, ऑस्ट्रिया, बुर्ना फासो, कॅनाडा, चिली, कोलंबिया, कोस्टा रिका, कोटे डी आइवर, क्रोएशिया, चेक गणराज्य, डेन्मार्क, डोमिनिकन गणराज्य, अल सल्वाडोर, अॅस्टोनिया, मायक्रोनेशिया, फिजी, फिनलँड, फ्राँस, जॉर्जिया, जर्मनी, घाना, ग-ीक, ग्वाटेमाला, गुयाना, हैती, होंडुरास, आयसलँड, आयरलँड, इटली, जपान, कोसावो, लातव्हिया, लाइबेरिया, लिचेंस्टीन, लिथुआनिया, लक्झमबर्ग, माल्टा.
तसेच मार्शल द्विप, मॉरिटानिया, मोंटेनेग-ो, नाउरु, नेदरलँड, न्यूझीलँड, नाइजर, उत्तर मॅसेडोनिया, नॉर्वे, फ्लाउ, पनामा. पराग्वे, पोर्तुगाल, कतर, कोरिया गणराज्य, साइप्रस गणराज्य, रोमानिया, सिएरा लियोन, स्लोव्हाकिया, स्लोव्होनिया, स्पेन, सूरीनाम, स्वीडन, टोगो, टोंगा, युगांडा, बि-टेन, यूक्रेन, समन व विदेशी प्रकरण आणि सुरक्षा धोरणासाठीचे यूरोपीयन संघाचे उच्च प्रतिनिधी.