पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

नवी दिल्ली

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 53 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार एकूण 60,88,437 सत्रांमध्ये, 53,61,89,903 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 63,80,937 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केन्द्र सरकार वचनबद्ध आहे.

भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.45म वर पोहचला आहे.

भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 3,13,38,088 तर गेल्या 24 तासात 35,743 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत.

भारतात गेल्या 24 तासात 38,667 नव्या रुग्णांची नोंद झाली.

सलग 48 दिवस 50,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे.

भारतात सक्रीय रुग्णसंखेतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 3,87,673 इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या 1.21म आहे.

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 22,29,798 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 49.17 (49,17,00,577) कोटींपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहीक पॉझिटीव्हीटी 2.05म तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी 1.73म आहे. गेल्या 19 दिवसांपासून हा 3म पेक्षा कमी तर सलग 68 व्या दिवशी 5म पेक्षा कमी आहे.

इतर अपडेटस :

 केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे 55.73 कोटींहून अधिक (55,73,55,480) लसींच्या मात्रा राज्ये केंद्र शासित प्रदेशांना पुरवल्या आहेत.आणखी 1,00,37,990 मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर आहेत. वाया गेलेल्या मात्रांसह आतापर्यंत एकूण 53,26,03,653 मात्रा देण्यात आल्या आहेत.(आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार) याशिवाय लसीच्या 2.85 कोटी हून अधिक (2,85,43,781) शिल्लक आणि वापरलेल्या नाहीत अशा मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!