केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री विरेन्द्र कुमार यांनी तापस या ऑनलाइन पोर्टलचे केले उद्घाटन
व्यसनाधीनांकडून होणारा छळ प्रतिबंध, वयोवृद्धांची काळजी, डिमेन्शियाग्रस्तांची काळजी आणि व्यवस्थापन, तृतीयपंथीयांचे प्रश्न आणि सामाजिक संरक्षणविषयक बाबी यांचे शिक्षण विनामूल्य उपलब्ध
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2021
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण खात्याचे केंद्रीय मंत्री विरेन्द्र कुमार यांनी तापस (Training for Augmenting Productivity and Services) या उत्पादकता आणि सेवा यांचे प्रशिक्षण देणाऱ्या ऑनलाइन पोर्टलचा आरंभ केला.
राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्था (NISD) आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय यांच्या सहयोगाने विकसित झालेल्ला पोर्टलचे उद्घाटन रामदास आठवले आणि प्रतिमा भौमिक या राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कोविड काळात ज्ञानार्जन आणि काम यांच्या यांच्यासाठी ऑनलाइन माध्यम अत्यावश्यक झाल्यामुळे तापस या कल्पनेला बळ मिळाले.
तापस हे पोर्टल राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था (NISD),, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्या सहयोगाने तयार झाले आहे. विषय तज्ञांची भाषणे , अभ्यास साहित्य आणि संबंधित इतर बाबी या पोर्टलवर आहेत. प्रत्यक्ष वर्गाला पुरवणी साहित्य म्हणून वापरता येण्याच्या दृष्टीने पोर्टल तयार करताना अध्यापनाशी कुठेही तडजोड होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणात सहभागी करून घेऊन त्यांचे ज्ञान आणि क्षमता वर्धनाच्या दृष्टीने कौशल्य विकसित करणे हा अशा प्रकारे प्रशिक्षण स्वाध्याय पोचवण्याचा मुख्य उद्देश आहे.
ज्या कोणाला एखाद्या विषयातील आपले ज्ञान वाढवण्याची इच्छा असेल त्यांना याचा वापर करता येईल. त्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
व्यसनाधीनां कडून होणारा छळ , जेरीएट्रिक म्हणजे वयोवृद्धांची काळजी घेणे, डिमेन्शिया ग्रस्तांची काळजी आणि व्यवस्थापन, तृतीयपंथी व्यक्तींचे प्रश्न आणि सामाजिक संरक्षण बाबींसंबंधी सर्वंकष अभ्यास हे यातील 5 मूलभूत अभ्यासक्रम आहेत.
याबाबतीत पुढाकार घेतल्याबद्दल वीरेंद्र कुमार यांनी NISD घ्या चमूचे अभिनंदन केले. सामाजिक संरक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या वर्गापर्यंत अध्यापन पोहोचवण्यासाठी हे ऑनलाइन माध्यम प्रभावीपणे काम करेल असेही म्हंटले आहे.
ऑनलाइन अभ्यासक्रम असल्यामुळे कोणालाही याचा वापर व्यवस्थित करण्याची मुभा आहे असेही त्यांनी नमूद केले.
तापस हे सर्वसाधारण MOOC (Massive Open Online Course) म्हणजे बहुसंख्यांना वापरता येणारे ऑनलाइन अभ्यासक्रमाचा मंच आहे त्यामध्ये ध्वनिचीत्रीत केलेले लेक्चर्स आणि ई-अभ्यासक्रम आहे असे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव आर सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले.
प्रशिक्षणार्थी आणि अभ्यासक्रमातील सहभागी व्यक्तींना एकमेकांशी संवाद साधण्याला प्रोत्साहन मिळावे मदत करण्यासाठी चर्चांसाठीचे फोरम यात समाविष्ट आहेत.