हॅकर्सनी मारला क्रिप्टोकरन्सीवर डल्ला, पॉली नेटवर्क साईट हॅक
नवी दिल्ली,
हॅकर्सनी आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या हॅकिंगचा उद्योग केला असून 4500 कोटींची डिजिटल किंवा क्रिप्टोकरन्सी लंपास केली आहे. क्रिप्टो ट्रान्स्फरिंगसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध कंपनी पॉली नेटवर्कने काल हॅकर्सनी नेटवर्क मध्ये घुसून ही रक्कम चोरल्याचे एका मागून एका केलेल्या टिवट मधून जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यातील 1930 कोटींची रक्कम हॅकर्सनी परत केल्याचेही समजते.
पॉली नेटवर्कने दिलेल्या माहितीनुसार हॅकर्सनी 26.9 कोटीपेक्षा जास्त इथिरीयम व 8.4 कोटी पेक्षा जास्त पॉलीगॉन करन्सी परत केलेली नाही. पण एकदा चोरी केल्यावर हॅकर्सनी काही रक्कम परत का केली हे समजू शकलेले नाही. कदाचित त्यांना पकडले जाण्याचा धोका वाटला असावा आणि त्या भीतीने त्यांनी काही टोकन परत केले असावे असे सांगितले जात आहे. क्रिप्टो करन्सीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी असून त्यात इथिरीयम सर्वाधिक चोरीला गेले आहे.