स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून सीमा रस्ते संघटनाकडून वैद्यकीय शिबिरांचे आयोजन
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2021
ठळक वैशिष्ट्ये :
- सीमावर्ती राज्ये आणि मित्र देशांमध्ये 75 वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जात आहेत
- गरजूंची मोफत वैद्यकीय तपासणी आणि मोफत औषधे
- कोविड -19 बद्दल स्थानिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे
- फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर्सचे मोफत वितरण.
सीमा रस्ते संघटना (बीआरओ) भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून सीमावर्ती राज्ये आणि मित्र देशांमध्ये 75 वैद्यकीय शिबिरे आयोजित करत आहे. जम्मू -काश्मीर, अरुणाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंड, सिक्कीम, मिझोराम आणि त्रिपुरा तसेच भूतानमध्ये मोठ्या प्रमाणात शिबिरे आयोजित केली जात आहेत.
मोहिमेचा भाग म्हणून, बीआरओ दुर्गम आणि सीमावर्ती भागात राहणाऱ्या गरजू लोकांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि मोफत औषधे पुरवत आहे. ही शिबिरे सीमा भागातील स्थानिक लोकांमध्ये कोविड -19 महामारीबाबत जागरुकता देखील निर्माण करत आहेत. लोकांना स्वच्छता, सामाजिक अंतर आणि मास्क घालण्याचे महत्त्व याबद्दल माहिती दिली जात आहे. उपक्रमाचा भाग म्हणून स्थानिकांना मोफत फेस मास्क आणि हँड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.