आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट “फाळणी भयावह स्मृती दिवस” म्हणून पाळला जाणार : पंतप्रधान
नवी दिल्ली 14 AUG 2021
आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा “फाळणी भयावह स्मृती दिवस” म्हणून पाळला जाईल असे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी म्हटले आहे.
” फाळणीची वेदना कधीच विसरता येणार नाही. द्वेश आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू भगीनींना विस्थापित व्हावे लागले, आपला जीव गमवावा लागला. आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा “फाळणी भयावह स्मृती दिवस” म्हणून पाळला जाईल.
#PartitionHorrorsRemembranceDay (फाळणी भयावह स्मृती दिवस) हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि द्वेशभावनेच्या विषाला संपवण्यासाठी प्रेरित करण्या बरोबरच एकता, सामाजिक सद्भावना आणि मानवीय संवेदनाही सशक्त होतील”
असे त्यांनी आपल्या ट्विटर संदेश मालिकेत म्हटले आहे.
” फाळणीची वेदना कधीच विसरता येणार नाही. द्वेश आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू भगीनींना विस्थापित व्हावे लागले, आपला जीव गमवावा लागला. आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा “फाळणी भयावह स्मृती दिवस” म्हणून पाळला जाईल.
#PartitionHorrorsRemembranceDay (फाळणी भयावह स्मृती दिवस) हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि द्वेशभावनेच्या विषैला संपवण्यासाठी प्रेरितच करणार नाही, तर एकता, सामाजिक सद्भावना आणि मानवीय संवेदनाही सशक्त होतील”