‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण आणि महाराजा सयाजीराव गायकवाड’ विषयावर प्रा. दिनेश पाटील यांचे व्याख्यान

नवी दिल्ली, दि. ९ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत  प्रा. दिनेश पाटील  हे बुधवार, 11 ऑगस्ट 2021 रोजी  ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण आणि महाराजा सयाजीराव गायकवाडे’ या विषयावर 55 वे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु आहे. व्याख्यानमालेत 11 ऑगस्ट रोजी  प्रा. दिनेश पाटील हे दुपारी ४ वाजता आपले विचार मांडणार आहेत.

 दिनेश पाटील यांच्या विषयी

प्रा. दिनेश पाटील हे यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात समाजशास्त्र या विषयाचे विभागप्रमुख म्हणुन कार्यरत आहेत. प्रा. पाटील यांनी  ‘शोध सयाजीराव गायकवाडांचा’ या विषयावर कार्यशाळा घेतल्या आहेत.  आधुनिक भारताचे शिल्पकार ‘महाराजा सयाजीराव गायकवाड : चित्र चरित्र’, ‘महाराजा सयाजीराव यांच्या सुधारणा- धर्म आणि सामाजिक’ हे ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद येथुन  सयाजी ज्ञानमालच्या पुस्तकांचे  संपादन प्रा. पाटील यांनी केले आहेत. या मालेतील 9 पुस्तकाचे लेखन श्री पाटील यांनी केले. सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यावर आधारित अनेक लेखही श्री पाटील यांनी लिहीले आहेत . यासोबतच ‘अस्पृश्य जाती’, ‘दुध पंढरी’  हे ग्रंथ प्रा. पाटील यांनी   प्रकाशित  केले आहेत.

प्रा. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबविले आहेत. 2013 पासून वारणानगर येथे महाविद्यालयात  विद्यार्थांसाठी  ‘जनता दरबार’ हा सर्जन शिक्षण  प्रयोग सुरु केला. याव्दारे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशिलता, संशोधन  वृत्ती  व समाजाभिमुखता  निर्माण करण्याचे काम हा गट करीत आहे. स्पर्धा , संवाद, समुपदेशनाच्या मदतीने विद्यार्थांमध्ये संशोधन लेखन कौशल्य वाढविण्याचे काम त्यांनी केले आहे.

बुधवारी  समाज माध्यमांहून व्याख्यानाचे प्रसारण

बुधवारी,  11 ऑगस्ट 2021 रोजी  दुपारी  4  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे.

हे व्याख्यान परिचय केंद्राचे  ‍मराठी  ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi  आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi   वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI  , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/   आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share   तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi  युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!