दुर्मिळ आजार असलेल्या व्यक्तींसाठी राष्ट्रीय पोर्टल
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2021
आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने राष्ट्रीय दुर्मिळ आजार धोरण 2021 नुसार दुर्मिळ आजार असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी निधी जमवण्यासाठी आणि स्वैच्छिक देणग्यांसाठी डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. डिजिटल पोर्टल https://rarediseases.nhp.gov.in/ वर उपलब्ध आहे.
औषध निर्मिती विभागाने फार्मास्युटिकल्ससाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. दुर्मिळ आजारांवरील औषधांसह विविध उत्पादन श्रेणींच्या देशांतर्गत उत्पादनासाठी या योजनेअंतर्गत निवडलेल्या उत्पादकांना आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे ‘फार्मास्युटिकल्स विभागाच्या संकेतस्थळावर ‘योजना’ अंतर्गत उपलब्ध आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती प्रविण पवार यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.