पेट्रोल-डिझेलच्या आजचे दर जारी, काय आहेत तुमच्या शहरांतील किमती?

नवी दिल्ली प्रतिनिधी

8 ऑगस्ट

आज पुन्हा एकदा सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. सलग बाविसाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी देशात सध्या ऐतिहासिक उंची गाठली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी, भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या 21 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही.

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

18 जुलैपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या महिन्यात 17 जुलै रोजी पेट्रोलची किंमत 29 ते 30 पैशांनी वाढवण्यात आली होती. त्यानंतरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

आज देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचे दर 101.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 107.83 रुपये आणि डिझेलची किंमत 97.45 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 102.08 रुपये, तर डिझेलचे दर 93.02 रुपये प्रति लिटर आहेत. तसेच, चेन्नईतही पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. चेन्नईत पेट्रोल 102.49 रुपये लिटर आहे, तर डिझेल 94.39 प्रति लिटरनं विकलं जात आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!