सीमा रस्ते संघटनेने स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांची केली सुरुवात
नवी दिल्ली 09 AUG 2021
ठळक मुद्दे:
- उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये शौर्य पुरस्कार विजेते आणि युद्ध वीरांचा सत्कार
- विविध कार्यक्रमांचा भाग म्हणून देशभरात वैद्यकीय शिबिरे, वृक्षारोपण अभियान आणि शालेय संवादाचे आयोजन
- स्वातंत्र्यदिनी भारतातील 75 सर्वोच्च स्थानांवर राष्ट्रीय ध्वज फडकवला जाईल
सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यास सुरुवात केली आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे औचित्य साधत बीआरओ देशव्यापी कल्याण आणि देशभक्तीपर उपक्रम/कार्यक्रमांचे आयोजन करत आहे ज्यात 75 वैद्यकीय शिबिरे, 75 ठिकाणी वृक्षारोपण मोहीम आणि संवाद आणि व्याख्यानांद्वारे मुलांना प्रेरित करण्यासाठी 75 शालेय संवाद यांचा समावेश आहे. स्वातंत्र्यदिनी भारतातील 75 सर्वोच्च स्थानांवर राष्ट्रीय ध्वज फडकवणे हा मुख्य कार्यक्रम असेल.
7 ऑगस्ट, 2021 रोजी बीआरओने उत्तराखंडमधील पिपलकोटी आणि पिथोरागढ आणि सिक्कीममधील चंदमारी येथे शौर्य पुरस्कार विजेते आणि युद्ध वीरांचा सत्कार केला.