डिजिटल इंडिया- इंटरनेट युजर संख्या 82 कोटींवर

नवी दिल्ली प्रतिनिधी

7 ऑॅगस्ट

भारतात मार्च 2021 पर्यंत सक्रीय इंटरनेट युजर्सची संख्या 82 कोटींच्या पुढे गेली असून आत्तापर्यंत 1,57,383 ग-ामपंचायती हायस्पीड ब-ॉडबँड इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत. तृणमुलचे खासदार डेरेक यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना इलेक्ट्रोनिक व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे.

सिस्कोच्या व्हिजुअल नेटवर्किंग इंडेक्स 2017 च्या रिपोर्ट मध्ये भारतात 2021 पर्यंत सक्रीय इंटरनेट युजर्सची संख्या 82 कोटींवर जाईल असे म्हटले गेले होते. हा अंदाज खरा ठरला असून ट्रायच्या रिपोर्ट नुसार 31 मार्च 2021 पर्यंत 82.53 कोटी इंटरनेटचे युजर्स आहेत. त्यात ग-ामीण भागातील युजर्स 30.2 कोटी तर शहरी भागात 50.02 कोटी युजर्स आहेत.

ग-ामीण भागात सरकारने ग-ामपंचायती व गावात भारतनेट योजना लागू केली असून 1 जुलै पासून 1,57,383 ग-ामपंचायती हायस्पीड इंटरनेट सेवेने जोडल्या गेल्या आहेत. यासाठी 5,25,706 किमी लांबीची ऑॅप्टिक फायबर केबल घातली गेली आहे. अन्य एका रिपोर्ट नुसार 2025 पर्यंत सक्रीय युजर्सच्या संख्येत 45 टक्के वाढ होऊन ही संख्या 90 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग-ामीण भागात युजर्स संख्या वाढण्याचा वेग अधिक असल्याचे दिसून येत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!