सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणातील मोठया प्रमाणातील दस्ताऐवजवर म्हटले याला आणण्यासाठी ट्रकची मदत घ्यावी लागली
नवी दिल्ली प्रतिनिधी
6ऑगस्ट
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी 51 खंडामधील एका मोठया दस्तऐवजला दाखल करण्यासाठी एका वादीला फटाकारले आणि म्हटले की आम्हांला तुमच्या फाईलीना न्यायालयात आणण्यासाठी एका ट्रकची मदत घ्यावी लागली आहे. तुम्ही आम्हांला आतंकित करु इच्छित आहात का ?
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही.रमन्ना आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठाने ट्राईसाठी नवीन टॅरिफ आदेशाला कायम ठेवणार्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरुध्द इंडियन ब-ॉडकास्टिंग फाउंडेशनच्या अपीलावरील सुनवाईच्या वेळी ही टिपणी केली.
न्यायमूर्ती रमन्नांनी म्हटले की तुम्ही 51 खंड दाखल केले आहेत आणि आम्हांला तुमच्या फाईलीना न्यायालयात आणण्यासाठी एका ट्रकची मदत घ्यावी लागली आहे. तुम्ही आम्हांला आतंकित करु इच्छित आहात का ? जर तुम्हाला सुनवाई पाहिजे असेल तर लहान संख्येत फाईली करा.
सुरुवातीला न्यायमूर्ती रमन्नानी याचिकाकर्त्यांद्वारा दाखल मते आणि दस्तऐवजच्या लांबीवर आश्चर्य व्यक्त केले. पीठाने म्हटले की आम्ही याला ऐकणार नाहीत. एका प्रकरणात 51 खंडांची कल्पना करा, एक संकलन फाईल करावे आणि याला आम्हांला द्यावे यानंतर आम्ही याला पाहूत.
ट्राइचे प्रतिनिधीत्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहतानी म्हटले की आम्ही फक्त दोन पानांचे शपथपत्र दाखल करुत. पीठाने म्हटले की आम्ही आता या प्रकरणाची सुनवाई करणार नाहीत आणि प्रकरणाची पुढील सुनवाई 18 ऑगस्टला निश्चित केली.
सर्वोच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुध्द एका अपीलावर सुनवाई करत होते. उच्च न्यायालयाने जानेवारी 2020मध्ये ट्राईद्वारा प्रसिध्द करण्यात आलेल्या टॅरिफ ऑर्डर (एपटीओ) च्या वैधतला आंशिकपणे कायम ठेवले होते. यात टेलीव्हिजन वाहिणीद्वारा लावण्यात आलेल्या दरांवर मूल्य सीमा निर्धारित केली गेली होती.