जनरल नरवणेचा दक्षिणी कमानचा दौरा, आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी कंपनीचा आढावा
नवी दिल्ली प्रतिनिधी
6ऑगस्ट
भारतीय स्थल सेनेचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणेनी शुक्रवारी दक्षिणी कमानचा दौरा केला आणि संरक्षण साहित्य उत्पादनामध्ये सहभागी असलेल्या खाजगी कंपनींच्या इंजीनियरिंग संशोधन केंद्र आणि रणनीतीक प्रणाली परिसराची समीक्षा केली. जनरल नरवणे पुणे व गोवाला लागून असलेल्या दक्षिण कमानच्या दोन दिवशीय दौर्यावर आहेत.
पुण्यातील आपल्या दौर्या दरम्यान सैन्य प्रमुख नरवणेनी पिंपरीमधील टाटा मोटर्सच्या कारखान्याला भेट दिली व येथील वाणिज्यीक वाहनांच्या असेंबली लाईन आणि इंजिनियरिंग रिसर्च सेंटर (ईआरसी) च्या संचालनाचा आढावा घेतला.
सैन्याने एका निवेदनात म्हटले की जेनॉन, एडब्ल्यूडी (4गुणा4), ट्रूप कॅरियर, लाईट बुलेट प्रूफ वाहन आणि कॉम्बेट सपोर्ट व्हीकल अर्थात माइन प्रोटेक्टेड व्हीकल्स आणि व्हील्ड आर्मर्ड एम्फीबियल्स प्लेटफॉर्म एडब्ल्यूडी (8गुणा8) कॉन्फिगरेशनसह टाटा वाहनांच्या एक मालिका डिस्पलेवर राहिली.
जनरल नरवणेनी पुण्या जवळील तळेगावमधील लार्सन अँड टुब-ोतील सामरिक प्रणाली परिसर (एसएससी) चाही दौरा केला आणि सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेमध्ये त्यांच्या उत्पादन सुविधा आणि विकासात्मक प्रयत्नाना पाहिले. त्यांना विविध संरक्षण संबंधीत कार्यक्रम आणि भारतीय सैन्या बरोबरील लार्सन अँड टुब-ोशी संबंधांची माहिती दिली गेली.
त्यानी संरक्षण निर्माणातील मिशन आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देण्यात दोनीही स्वदेशी उत्पादकांच्या प्रयत्नांची प्रशवंसा केली. या व्यतिरीक्त ते भारतीय चित्रपट व टेलीव्हिजन संस्था (एफटीआयआय) च्या टेलीव्हिजन विंगच्या सुवर्ण जयंती सोहळा (1971-2021) मध्ये मुख्य पाहुणे असतील. ते शनिवारी गोव्यातील आयएनएस हंसाचाही दौरा करतील.