भष्टाचार आणि काळ्या पैशाबाबत सरकारची कठोर भूमिका- शांघाय सहकार्य संघटनेच्या विधी आणि न्याय मंत्र्यांच्या आठव्या बैठकीत किरेन रिजिजू यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली प्रतिनिधी

6 ऑगस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची भ-ष्टाचार आणि काळ्या पैशाबाबत कठोर भूमिका आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रीजीजु यांनी केले आहे. देशात भ-ष्टाचाराचा बिमोड करण्यासाठी उत्तम कायदेशीर व्यवस्था आणि मजबूत संस्थात्मक यंत्रणा आहे, असेही ते म्हणाले.

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या विधी आणि न्याय मंत्र्यांची आठवी बैठक आज झाली, त्यात ते बोलत होते. सर्वांना सहज आणि स्वस्त दरात, न्याय मिळेल, यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली.

भष्टाचारला पायबंद घालण्यासाठीचे उपाय, तसेच अनेक विवाद सोडवण्यासाठीच्या पर्यायी व्यवस्था, व्यावसायिकांना सुविधा देणारे कायदे आणि नियम इत्यादी उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. समाजातील वंचित वर्गाला मोफत कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या उपक्रमांविषयी देखील त्यांनी या बैठकीत माहिती दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!