डॉ विरेन्द्र कुमार यांच्या हस्ते “पीएम-दक्ष” पोर्टल आणि “पीएम-दक्ष” मोबाईल अॅपचे 7 ऑगस्ट रोजी उद्घाटन

नवी दिल्‍ली, 6 ऑगस्‍ट 2021

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ विरेन्द्र कुमार यांच्या हस्ते उद्या म्हणजेच सात ऑगस्ट 2021 रोजी ‘पीएम-दक्ष’ पोर्टल आणि ‘पीएम-दक्ष’ या मोबाईल अॅपचे उद्घाटन दिल्लीतल्या डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात, नालंदा ऑडिटोरियम इथे होणार आहे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने एनईजीडी च्या सहकार्याने हे पोर्टल आणि अॅप विकसित केले आहे. या पोर्टलवर, मागासवर्ग, अनिसूचित जाती आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या मंत्रालयाच्या योजनांची माहिती मिळू शकेल.

प्रधान मंत्री दक्षता आणि कुशलता संपन्न हिताग्रही (पीएम-दक्ष) योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकार वर्ष 2020-21 पासून करत आहे. या योजनेअंतर्गत, पात्र लक्ष्यीत गटांना पुढील बाबतीत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.  यात- 1) कौशल्य वृद्धी/पुनरकौशल्य, 2) लघुकालीन प्रशिक्षण कार्यक्रम, 3) दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम, 4) उद्यमशीलता विकास कार्यक्रम इत्यादी प्रशिक्षण दिले जाते.

सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ए नारायणस्वामी आणि प्रतिमा भौमिक देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!