केंद्र सरकारची लोकसभेत माहिती; वंदे भारत अभियानाअंतर्गत 71 लाख भारतीयांची घरवापसी
नवी दिल्ली प्रतिनिधी
4 ऑगस्ट
परदेशात अडकून पडलेल्या 71 लाख भारतीयांना वंदे भारत अभियानाअंतर्गत भारत परत आणल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. वंदे भारत अभियानाअंतर्गत आतापर्यंत एक कोटीहून अधिक नागरिकांची घरवापसी झाली असल्याचेही केंद्र सरकारने सांगितले.
वंदे भारत हे अभियान 7 मे 2020 पासून सुरू करण्यात आले. या अभियानाअंतर्गत जे जे भारतीय नागरिक परदेशात अडकले आहे त्यांना मायदेशी परत आणण्यात आले. तर जे परदेशी नागरिक भारतात अडकले होते त्यांना आपल्या मायदेशी सोडण्यात आले. त्यानुसार 100 हून अधिक देशांतून 88 हजार विमानांनी आतापर्यंत 71 लाख भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत. तर 87 हजार 600 विमानांतून 57 लाख नागरिक भारतातून आपल्या मायदेशी परतले आहेत. अशा प्रकारे एक कोटी 28 लाख नागरिकांनी वंदे भारत मिशनअंतर्गत प्रवास केला आहे.