राष्ट्रीय महामार्गांवर सौर पॅनेल बसवणे
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर सौर ऊर्जा निर्मितीची चाचपणी करण्याचा आणि कोणत्याही वाहतूक/महामार्गाशी संबंधित सेवा/वृक्षारोपण करण्यासाठी राखीव नाहीत आणि सौर पॅनेलच्या उभारणी संबंधित आवश्यकता पूर्ण करतात अशा ठिकाणी सौर पॅनेल बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ऊर्जा मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील संयुक्त उपक्रम एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडशी (ईईएसएल) एनएचएआयच्या उपलब्ध रिकाम्या जमिनीवर आणि टोल प्लाझावरील एनएचएआय इमारतीच्या छतावर आणि इतर एनएचएआयच्या मालकीच्या इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचा व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही.
EPE आणि DME वर (382 KWp च्या दुहाई इंटरचेंज आणि 450 KWp क्षमतेच्या दसना इंटरचेंजवर) आणि पुणे -सोलापूर (1 ), नागपूर बायपास (1), वायगंगा पूल ते छत्तीसगड सीमा (1) आणि सोलापूर येडलशी (2 ) प्रकल्पांमध्ये टोल प्लाझावरील छतांवर सौर पॅनेल्स बसवण्यात आली आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.