12-18 वयोगटातील मुलांचे येत्या दोन आठवड्यांमध्ये लसीकरण? मिळू शकते ‘या’ लसीला मंजूरी
नवी दिल्ली प्रतिनिधी
4 ऑॅगस्ट
झायडस कॅडिला निर्मित लसीला आपात्कालीन वापरासाठी भारतात दोन आठवड्यांत मंजुरी मिळू शकते. 12 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी ही लस 67 टक्क्यांपर्यंत परिणामकारक आहे. झायडस कॅडिलाच्या कोरोना लसीची 12 वर्षांहून अधिक वयाच्या मुलांवर चाचणी झाली आहे. या लसीला आता लवकरच डीसीजीआय परवानगी मिळण्याची आशा आहे. नीति आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. पॉल यांनी ही माहिती दिली आहे.
झायडस कॅडिलाची कोरोना लस जायकोव डी (नूर्लेीं ऊ) ची तिसर्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. कोरोना लसीसाठी सीडीएससीओ म्हणजेच, सेंट्रल ड्रग स्टँण्डर्ड कंट्रोल आर्गेनायजेशनकडे आपातकालीन वापरासाठी कॅडिलाने मंजूरी मागितली आहे. जवळपास 28 हजार लोकांवर चाचणी पूर्ण केल्यानंतर कंपनीने इमरजेंसी यूज ऑॅथरायजेशन म्हणजेच, आपातकालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. कंपनीच्या अर्जावर सीडीएससीओकडून डाटा अॅनालिसिस केले जात आहे. कंपनीच्या वतीने व्हॅक्सिन ट्रायलचा सर्व डाटा देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी झायडस कॅडिलाने दावा केला होता की, या लसीची 12 ते 18 वर्षांच्या जवळपास हजार मुलांवर ट्रायल करण्यात आली आणि ही लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची एफिकेसी 66.60 टक्के आहे. तीन डोस असणारी ही लस 4-4 आठवड्यांच्या अंतरावर दिली जाऊ शकते. या लसीला 2-8 डिग-ी तापमानावर स्टोअर केले जाऊ शकते. ही पहिली झश्ररीाळव डीएनए लस आहे. यामध्ये इंजेक्शनचा वापर केला जात नाही, तर ही लस व्हॅक्सिन नीडल फ्री आहे. ही लस जेट इंजेक्टरमार्फत देण्यात येईल. कंपनीची योजना वार्षिक 10-12 कोटी लसीचे डोस तयार करण्याची आहे.
लहान मुलांसाठी परिणामकारक लस तयार करण्यासाठी झायडस कॅडिया व्यतिरिक्त दुसर्या अनेक कंपन्याही काम करत आहेत. भारत बायोटेकचे 2 ते 18 वर्षांच्या मुलांवरील ट्रायल जवळपास पूर्ण झाले आहे. कंपनी लवकरच चाचणी पूर्ण करुन अंतरिम डेटासह आपातकालीन यूज ऑॅथरायजेशनसाठी अर्ज करणार आहे. याव्यतिरिक्त नोवाव्हॅक्ससाठीही लहान मुलांच्या ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे. अशातच बायो ईने परवानगी मागितली आहे. आशा आहे की, लहान मुलांसाठीची लस लवकरच मिळू शकते.
कोरोनाची दुसरी लाट देशभरात ओसरताना दिसत आहे. एक संकट दूर होत असताना आता तिसर्या लाटेच्या धोक्याबाबतही शक्यता वर्तवली जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लवकरच भारतात दिसू शकते. यासह, काही तज्ञ आणि अभ्यासकांच्या मते, तिसर्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका होण्याची शक्यता आहे. या दरम्यान मुलांच्या लसीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
याबाबत दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला मुलांच्या वापरासाठी सप्टेंबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. कोव्हॅक्सिनच्या दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. यासह ते म्हणाले की फायजर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ती देखील मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते.