पेगासस प्रकरण : नितीश कुमारांच्या मागणीनंतर आतातरी मोदी सरकारने चौकशी करावी – संजय राऊत
नवी दिल्ली प्रतिनिधी
3 ऑगस्ट
मी नितीश कुमारांचा आभारी आहे. ते नेहमी एक आदर्श नेते राहिले आहेत. आज ते केंद्र सरकारसोबत आहेत. मात्र, त्यांचा आत्मा आमच्या सोबत आहे, हे मला माहित आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले आहे. जर ते म्हणत असतील की पेगासस प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी तर विरोधक जे बोलत आहेत ते तेच बोलले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतातरी ऐकावे आणि पेगासस प्रकरणाची चौकशी करावी, असेही ते म्हणाले.
नितीश कुमारांची मागणी काय?
गेल्या काही दिवसांपासून पेगासस हेरगिरी प्रकरणी संसदेत व संसदेबाहेर गोंधळ सुरू आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणी चौकशी करावी व संसदेत चर्चा करावी, अशी विरोधी पक्षांनी मागणी लावून दरली आहे. तर केंद्र सरकारने चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी मान्य केली नाही. अशातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) सहभागी असलेल्या जनता दलाचे नेते नीतीश कुमार यांनीदेखील पेगासस प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार म्हणाले, पेगागस हेरगिरीची चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी. इतके दिवस विरोधी पक्षाकडून वारंवार मागणी केली जात आहे. आम्ही आजवर टेलिफॉन टॅपिंगचे ऐकले आहे.
सर्वोच्च न्यायालयात 5 ऑगस्टला होणार सुनावणी-
पेगासस हेरगिरी प्रकरणाची विशेष चौकशी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. यावर सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे खंडपीठ 5 ऑगस्टला म्हणजेच गुरुवारी सुनावणी करणार आहे. विरोधी पक्ष नेते, पत्रकार आणि इतरांची इस्रायली स्पायवेअरद्वारे हेरगिरी केल्याचा आरोप याचिकेत ज्येष्ठ पत्रकार एन राम, सीपीएम नेते जॉन बि-टस आणि वकील एमएल शर्मा यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण –
भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इस्रायली पेगासस नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लोकांच्या व्हॉटसअॅपवर पाळत ठेवल्याची माहिती 2019 मध्ये उघड झाली होती. व्हॉटस अॅपनं यासंदर्भात एनएसओ (र्एध्) या कंपनीला कोर्टात खेचल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष याकडे वेधलं गेलं आहे. इस्रायलच्या र्एध् या इस्त्रायली सायबर इंटेलिजन्स कंपनीने पेगासस सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्हॉटसअॅपची यंत्रणा भेदून पत्रकार, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याचे व्हॉटसअपनं जाहीर केले. र्एध् या कंपनीनं मात्र त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले.
राज्यसभेत 28 नोव्हेंबर 2019 रोजी काँग-ेस नेते दिग्विजय सिंह यांनी सरकारला पेगासस (झशसर्रीीी) विषयी काही सवाल केले होते. 18 जुलै रोजी त्यांनी याविषयी टवीट करून सरकारवर हेरगिरी केल्याचा आरोप लावला. बीजेपीचे राज्यसभा खासदार सुब-मण्यन स्वामी यांनी सरकारला इशारा दिला होता. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेला सांगावे की इजरायली कंपनीशी सरकारचे काही देणे-घेणे नाही. नाहीतर वाटरगेट प्रकरणाप्रमाणे सत्य समोर येईल व त्यामुळे भाजपला नुकसान सहन करावे लागेल.
काय आहे पेगासस स्पाइवेयर ?
पेगासस एक पावरफुल स्पाइवेयर सॉफ्टवेयर आहे. जे मोबाइल आणि कॉम्प्युटरमधून गोपनीय व वैयक्तिक माहिती चोरून हॅकर्सला पुरवते. याला स्पाइवेयर म्हटले जाते. हे सॉफ्टवेयर तुमच्या फोनच्या माध्यमातून तुमची हेरगिरी करते. इजरायली कंपनी एनएसओ ग-ुपचा दावा आहे, की हे सॉफ्टवेअर ते देशातील अनेक सरकारांना विकत देते. याच्या माध्यमातून आयओएस किंवा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असणारे फोन हॅक केले जाऊ शकतात. त्यानंतर फोनचा डेटा, ई-मेल, कॅमेरा, कॉल रेकॉर्ड आणि फोटोसह प्रत्येक एक्टिव्हीटीला ट्रेस केले जाते.