क्रीडा मंत्री श्री अनुराग सिंह ठाकूर यांनी पॅरालिम्पिक संकल्पना गीत केले प्रकाशित

नवी दिल्ली प्रतिनिधी

3 ऑगस्ट

फकर दे कमाल हे गाणे एक दिव्यांग क्रिकेटपटू संजीव सिंग यांनी संगीतबद्ध केले आणि गायले आहे यावेळी विक्रमी संख्येने 54 दिव्यांग खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये 9 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, श्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय पॅरालिम्पिक चमूसाठी ‘कर दे कमाल तू‘ हे संकल्पना गीत प्रकाशित केले. क्रीडा मंत्रालयाचे सचिव श्री रवी मित्तल; सहसचिव (क्रीडा) श्री एल.एस. सिंह, भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्ष डॉ.दीपा मलिक; सरचिटणीस श्री गुरशरण सिंह आणि मुख्य प्रायोजक श्री. अविनाश राय खन्ना देखील यावेळी आभासी माध्यमातून उपस्थित होते.

फकर दे कमाल तूङ्ग हे गाणे एक दिव्यांग क्रिकेटपटू संजीव सिंह यांनी लिहिले आहे आणि ते लखनौचे रहिवासी आहेत.सर्वसमावेशकता अधोरिखित करण्यासाठी दिव्यांग समुदायाकडून गाणे रचले जावे , ही भारतीय पॅरालिम्पिक समितीची कल्पना होती.

यावेळी बोलताना श्री अनुराग ठाकूर म्हणाले, ‘भारत टोक्योमध्ये होणार्‍या पॅरालिम्पिक क्रीडास्पर्धेसाठी 9 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार्‍या 54 पॅरा-खेळाडूंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू पाठवत आहे. आमच्या पॅरा- खेळाडूंचा निर्धार त्यांच्या अभूतपूर्व मानवी चैतन्याचे दर्शन घडवतो. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा 130 कोटी भारतीयांकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळते ! मला अत्यंत विश्वास आहे की,आमचे पॅरा-खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करतील ! पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आपल्या रिओ 2016 मधील सहभागी पॅरालिम्पिक क्रीडापटूंना भेटले होते आणि आपल्या क्रीडापटूंच्या कल्याणासाठी नेहमीच त्यांनी उत्सुकता दाखवली आहे.तसेच देशभरातील क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासासह प्रतिभा जोपासण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केले आहे”.

गाण्याचे संगीतकार आणि गायक संजीव सिंह यांनी भावना व्यक्त केल्या की, ”हा केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण समुदायासाठी अभिमानाचा क्षण होता.

संजीव सिंह म्हणाले की, रिओ 2016 पॅरा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेमध्ये एक खेळाडू म्हणून डॉ.दीपा मलिक यांनी केलेल्या यशस्वी कामगिरीने त्यांच्याबद्दल एक कविता लिहिण्यास प्रेरित केले या कवितेतून हे संकल्पना गीत आकाराला आले.”

भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्ष दीपा मलिक म्हणाल्या, ‘भारताच्या पॅरालिम्पिक समितीची अध्यक्ष आणि ’आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठीच्या राष्ट्रीय समितीची सदस्य म्हणून, मी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या भारत75 या सर्वसमावेशक भारताच्या दृष्टिकोनाला पंख देण्याचा हा माझा प्रयत्न मानते. हे संकल्पना गीत भारतीय पॅरालिम्पिक चमूचे मनोबल वाढवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. ङ्ग

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!