ट्रिब्यूनल रिफॉर्म बिल 2021 मंजुरीनंतर लोकसभा स्थगित

नवी दिल्ली प्रतिनिधी

3ऑगस्ट

विरोधकांच्या गोंधळा दरम्यान ट्रिब्यूनल रिफॉर्म बिल 2021 ला मंगळवारी लोकसभेत मंजूर केल्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत हे विधेयक सादर केले. हे विधेयक वर्तमान काही अपीलिय शाखांना भंग करणे आणि त्यांचे कार्य (जसे की अपीलांचा निर्णय) ला अन्य वर्तमान न्यायिक शाखांकडे स्थानांतरीत करण्याचा प्रयत्न करत आहे जे एप्रिल 2021 मध्ये अशाच प्रकारच्या अध्यादेशाची जाग घेईल.

लोकसभेचे कामकाज तिसर्‍यांदा स्थगित झाल्यानंतर ज्यावेळी संध्याकाळी 4 वाजता परत सुरु झाल्यानंतर तत्काळ उपाध्यक्ष राजेंद्र अग-वाल यांनी सीतारमण यांना विधेयक सादर करण्याची परवानगी दिली.

विधेयकावर बोलताना अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटले की विरोधकांनी यावर चर्चा करण्यासाठी चर्चेत भाग घेतला असता तर चांगले झाले असते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारने या संदर्भात अध्यादेश आणला होता ज्याला ट्रिब्यूनल रिफॉर्म बिल 2021 ला प्रतिस्थापित केले जाणे आहे.

त्यांनी म्हटले की फक्त अत्यावश्यकतेच्या कारणामुळे सरकारला अध्यादेशाचा मार्ग स्वीकारण्याचा आधार घ्यावा लागला होता. आता आम्ही एक विधेयके आणू इच्छित आहोत तर विरोधकांना यामुळे अडचण होत आहे. या विधेयकातील सर्व खंड हे जसे अध्यादेशातील आहेत तसेच आहेत.

या दरम्यान काँग-ेसचे नेते अधीर रंजन चौधरीनी विरोध केला की विधेयकाला गोंधळामध्येच मंजूर केले जात आहे. हे विधेयक न्यायपालिकेवर एक गंभीर अतिक्रमणा व्यतिरीक्त अजून काहीही नाही.

रिव्हेल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीचे सदस्य एन.के.प्रेमचंद्रन यांनी म्हटले की सभागृह योग्यपणे चालत नाही आणि गोंधळाच्या दरम्यान विधेयकाला मंजूर केले नाही पाहिजे.

ट्रिब्यूनल रिफॉर्म बिल 2021 विना चर्चेचे मतदानासाठी आणले गेले आणि याला मंजूर करण्यात आले. यानंतर उपसभापतीनी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!