जातीभेद आणि जातीयवाद नष्ट करणे

नवी दिल्ली प्रतिनिधी

3 ऑगस्ट

जातीभेद आणि जातीयवाद ही सामाजिक दुष्कृत्य आहेत, जी सामाजिक चळवळींद्वारे नष्ट केली जाऊ शकतात, हे मंत्रालय अस्पृश्यता निर्मूलनासाठी पावले उचलून, प्रगतीसाठी सर्वांना समान आर्थिक आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात योगदान देते आहे. जेथे पती  पत्नीपैकी एक अनुसूचित जातीतील आहे, अशा आंतरजातीय विवाहांना हे मंत्रालय प्रोत्साहन देते. गृह मंत्रालयाने 2008 मध्ये सांप्रदायिक सद्?भावना संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, राज्य सरकारांनाकेंद्रशासित प्रदेश प्रशासनांना वेळोवेळी योग्य सल्ला आणि दक्षता संदेश पाठवले जातात. देशातील सांप्रदायिक सौहार्दावर परिणाम करणार्‍या संघटनांच्या कृत्यावर देखील कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांचे लक्ष असते आणि आवश्यक तेथे कायदेशीर कारवाई केली जाते.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री ए. नारायणस्वामी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!