दोषी पादरी बरोबर विवाहाची परवानगी मागणार्या बलात्कार पीडितेच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली प्रतिनिधी
2ऑगस्ट
पूर्व कॅथोलिक पादरी रॉबिन वडक्कमचेरीने बलात्कार केलेल्या मुली बरोबर विवाह करण्यासाठी अंतरीम जमानत देण्याची मागणीसाठी दाखल याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. रॉबिनने ज्या मुलीवर बलात्कार केला होता ती गर्भवती आहे.
केरळमधील बलात्कार पीडित मुलीने पादरी रॉबिन वडक्क्मचेरी बरोबर विवाह करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती विनीत सरन आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरींच्या पीठाने म्हटले की उच्च न्यायालयाने सर्वकाही नोट केल्यानंतरही जाणूबुझून या प्रकरणात कठोर टिपणी केली आहे. पीठाने म्हटले की आम्ही हस्तक्षेप करावे असे कोणतेही कारण दिसून येत नाही.
या आधी वडक्कमचेरीनी पीडिता बरोबर विवाह करण्याची परवानगी मागण्यासाठी केरळ उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती परंतु या याचिकेला फेटाळे होते.
सोमवारी मुलीच्या वकिलानी सर्वोच्च न्यायालयाकडे वडक्कमचेरीला जेलच्या बाहेर येणे आणि पीडिता बरोबर विवाह करण्याची परवानगी देण्याचा आग-ह केला आणि म्हटले की ही त्यांची एक संयुक्त विनंती आहे.
वडक्कमचेरीच्या वकिलानी जमानत प्रकरणात उच्च न्यायालयाद्वारा दिलेल्या व्यापक टिपणींचा हवाला दिला. वकिलाने जमानत याचिकेत तर्क दिला की विवाह करण्याचा माझ्या पक्षकाराच्या अधिकारामध्ये कसे काय अडथळा आणू शकतात आणि टिपण्या अशा असल्या नाही पाहिजे ज्यामुळे त्यांच्या अर्जासाठी अडथळा निर्माण होईल. पीठाने म्हटले की तुम्ही स्वत: याला आमंत्रीत केले आहे.
दोनीही बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना प्रकरणात उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. फेब-ुवारी 2019 मध्ये एका न्यायालयाने वडक्कमचेरीना एका अल्पवयीनवर बलात्कार करणे आणि तिला गर्भवती करण्याच्या प्रकरणात दोषी ठरविले आणि 20 वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती.
यानंतर चर्चनेही वडक्कमचेरीना पदारी पदावरुन बरखास्त करण्याचे पाऊल उचलत 2020 मध्ये त्याना पदावरुन हटविले गेले.