अकाली दलाचे पाच नेते भाजपमध्ये सामील
नवी दिल्ली प्रतिनिधी
2ऑगस्ट
पंजाबमध्ये पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीच्या आधी शिरोमणि अकाली दल (शिअद) चे पाच नेते आणि एक माजी टिव्ही होस्ट सोमवारी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये सामिल झाले.
अकाली दलाच्या महिला शाखेच्या माजी राष्ट्रीय महासचिव अमनजोत कौर रामूवालिया आणि गुरप्रीत सिंह शाहपूर,. चांद सिंह चट्टा, बलजिंदर सिंह डकोहा आणि प्रीतम सिंह हे भाजपच्या मुख्यालयामध्ये केंद्रिय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ व भाजपचे पंजाब प्रदेश प्रभारी दुष्यंत गौतम यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात सामिल झाले.
पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडुकीत सत्तारुढ काँग-ेस, भाजप, शिअद आणि आम आदमी पार्टी (आप) मध्ये चतुष्कोणीय सामना होण्याची शक्यता आहे.
अमनजोत कौर रामूवालिया ह्या माजी केंद्रियमंत्री बलवंत सिंह रामूवालियांची मुलगी आहेत. एक माजी टिवी होस्ट अँकर चेतन मोहन जोशीही पक्षात सामिल झालेत.
शिअद नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत करताना शेखावत म्हणाले की हे नेते भाजपमध्ये सामिल झाल्याने माहिती पडते की विधानसभा निवडणुकीच्या आधी पंजाबमध्ये परिवर्तनाची हवा कोणत्या दिशेमध्ये वाहत आहे. शेखावत यांनी आरोप केला की काही राजकिय पक्ष सत्तेच्या भूकेसाठी शेतकर्यांना फसवत आहेत.
गौतम यांनी म्हटले की पंजाबमधील लोकांना शांती हवी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आशेच्या नजरेतून पाहत आहेत. पंजाबमध्ये भाजपचा परिवार वाढत असून आगामी दिवसांमध्ये अजून लोक भाजपमध्ये सामिल होतील.
चुघ यांनी म्हटले की लोकांच्या मते देश आणि पंजाबसह सर्व राज्यांचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली शक्य आहे.