देशात सलग 16 व्या दिवशीही पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदल नाही
नवी दिल्ली प्रतिनिधी
2ऑगस्ट
तेल वितरण कंपन्यां (ओएमसी) नी सोमवारी सलग 16 व्या दिवशीही इंधन किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कारण जागतीकस्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीच्या दरम्यान प्रतिक्षा करणे व देखरेख करणे सुरु आहे. यानुसार सोमवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटरवर तर डिझेल 89.87 रुपये प्रति लिटरच्या अपरिवर्तीत किंमतींवर विकले जात होते. तेल इंधनाच्या किंमती ह्या 18 जुलै पासून स्थिर आहेत.
इंधनाच्या किंमतीमधील स्थिरता मागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे जागतीक तेलाच्या किंमतीमध्ये 10 टक्क्यांपेक्षा अधिकची घसरण आहे जी मागील महिन्याच्या सुरुवातीला बेंचमार्क क्रूड 69 डॉलर प्रति बॅरल पर्यंत घसरले होते. मजबूत मागणीच्या अंदाजामध्ये हे परत एकदा जवळपास 75 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहचले आहे.
ओपेकचे कच्चे तेल उत्पादनाला वाढविण्यासाठी एका करारा पर्यंत पोहचण्या बरोबरच तेलाच्या किंमती नरम राहिण्याची आशा आहे. हे दिर्घकाळानंतर भारतामध्ये इंधनाच्या किंमतीमध्ये वास्तवामध्ये घसरणीचा मार्ग बनू शकतो आहे.
मुंबई शहरात 29 मेला पहिल्यांदा पेट्रोलची किंमती 100 रुपयाच्या पुढे गेली व ती 107.83 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 97.45 प्रति लिटर आहे जी इतर महानगरांच्या तुलनेत सर्वांत जास्त आहे.
सर्व महानगरांमध्ये पेट्रोलची किंमत आता 100 रुपये प्रति लीटरच्या पुढे गेल्या आहेत. एक पंधरावाडयात दिर्घकाळा पर्यंत किंमतीमधील स्थिरता ही 41 दिवसांमधील वाढ आणि 1 मे पासून 50 दिवसां पर्यंत परिवर्तीत राहिल्या आहेत. 41 दिवसांमधील वाढीमुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत 11.44 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमत 9.14 रुपये प्रति लिटरने वाढल्या आहेत.
एप्रिल 2020 पासून आता पर्यंत दिल्लीत पेट्रोलची किंमत 32.25 रुपये प्रति लिटरने 69.59 रुपयावरुन 101.84 रुपये प्रति लिटर झाल्या आहेत. तसेच डिझेलची किंमतही 27.58 रुपयांने वाढून 62.29 रुपयांवरुन 89.87 रुपये प्रति लिटर झाल्या आहेत.