स्मशानात पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; पुजारीने वाईट कृत्य केलेल्याचे आरोप

नवी दिल्ली प्रतिनिधी

2 ऑगस्ट

राजधानीत 9 वर्षांच्या मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र एकचं खळबळ माजली आहे. दिल्ली कॅन्ट सागरपूर बि-ज स्मशानभूमीत मुलीच्या रहस्यमय मृत्यूनंतर गावातील लोकांनी स्मशानभूमीत गोंधळ घातला. स्मशानभूमीतील पुजारीने मुलीसोबत वाईट कृत्य करून तिला जाळून टाकल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर पुजारीने शॉक लगून मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

मिळेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी जवळपास 5च्या सुमारास मुलगी स्मशानभूमीत पाणी भरण्यासाठी गेली होती. त्याचं ठिकाणी मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर पुजारीने तात्काळ मुलीच्या आंतिमसंस्काराची तयारी सुरू केली. या घटनेची माहिती गावकर्‍यांना मिळताचं त्यांनी स्मशानभूमीच्या दिशेने धाव घेतली.

त्यानंतर सदर घटनेची माहिची गावकर्‍यांनी पोलिसांना दिली. पोलिसांना आरोपांच्या आधारावर पंडीत आणि त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. दिल्ली पोलीस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, मुलगी साडेपाचच्या सुमारास स्मशानभूमीत वॉटर कूलरमधून पाणी आणण्यासाठी गेली होती.

अर्ध्या तासानंतर मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पंडीतने तिच्या नातेवाईकांना दिली. मुलीच्या ओठांचा रंग निळा झाला होता शिवाय तिच्या हातावर भाजल्याचे डाग देखील होते. मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पुजारीने सांगितले की, मुलीचा मृत्यू शॉक लागल्यामुळे झाला.

कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की पुजारी आणि त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या 2-3 लोकांनी मुलीवर त्वरित अंत्यसंस्कार करावे असा दबाव आणला, पोलिसांना माहिती झालं तर ते मुलीच्या शरीरातील अवयव काढून घेतील. त्यामुळे मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आला.

पण जेव्हा गावकर्‍यांना ही धक्कादायक माहिती मिळाली तेव्हा त्यांनी स्मशानभूमीच्या दिशेने धाव घेतली आणि जळत असलेला मृतदेह पाण्यात टाकलं. त्यानंतर पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. आता याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!