देशात तिसर्या लाटेचा धोका? सलग सहा दिवस 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, केरळात वाढता प्रादुर्भाव
नवी दिल्ली प्रतिनिधी
2 ऑॅगस्ट
देशभरात कोरोनाचं संकट अद्याप सुरुच आहे. गेल्या सलग सहा दिवसांपासून 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 40,134 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 422 रुग्णांनी जीव गमावला आहे. काल (रविवारी) केरळमध्ये सर्वाधिक 20,728 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत 36,946 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
केरळमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सलग सहाव्या दिवशी केरळमध्ये 20 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये 20,728 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 34,11,489 वर पोहोचली आहे.
देशातील कोरोना स्थिती
कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत तीन कोटी 16 लाख 95 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 24 हजार 773 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 8 लाख 57 हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात कोरोनाची लागण झालेल्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 13 हजार 718 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
राज्यात काल (रविवारी) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. राज्यात काल (रविवारी) 6,479 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 4 हजार 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 94 हजार 896 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.59 टक्के झाले आहे.
राज्यात काल (रविवारी) कोरोनामुळे 157 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 33 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 78 हजार 962 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (8), हिंगोली (74), अमरावती (82) वाशिम (88), गोंदिया (98, ), गडचिरोली (15) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 680 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 29 हजार 689 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची एकूण संख्या कमी होऊन 3 लाख 98 हजार 100 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 14 लाख 40 हजार 951 वर पोहोचली आहे. तर महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत 4 लाख 21 हजार 382 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 42 हजार 363 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 3 कोटी 6 लाख 21 हजार 469 वर पोहोचला आहे.